‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘मन धागा धागा जोडते नवा’मध्ये सध्या लग्नीनघाई सुरू आहे. आनंदी व सार्थकचं पुन्हा एकदा मोठ्या धुमधडाक्यात लग्न होतं आहे. नुकताच मेहंदी, हळदीचा समारंभ पाहायला मिळाला. लवकरच आनंदी व सार्थकचा संगीत सोहळा होणार आहे. यावेळी ‘स्टार प्रवाह’ परिवारातील काही कलाकार मंडळी परफॉर्मन्स करणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्राची लाडकी जोडी ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली-अर्जुन.

काही दिवसांपूर्वी ‘मन धागा धागा जोडते नवा’मधील आनंदी व सार्थकला शुभेच्छा देण्यासाठी ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मधील कला-अद्वैत व ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील जानकी-हृषिकेशन पोहोचले होते. त्यानंतर आता आनंदी व सार्थकच्या संगीत सोहळ्यात ‘ठरलं तर मग’ मधील सायली-अर्जुन पाहायला मिळणार आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर ‘या’ अभिनेत्रीला म्हणायचे नाकातला केस, स्वतः किस्सा सांगत म्हणाल्या…

या संगीत सोहळ्यात प्रत्येकजण एक जबरदस्त डान्स परफॉर्मन्स करताना दिसणार आहे. सायली-अर्जुन स्वप्नील जोशी व सोनाली कुलकर्णीच्या ‘मितवा’ गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळणार आहेत. ‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावर सायली-अर्जुनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अर्जुन आम्ही ‘मितवा’ गाण्यावर डान्स करणार असल्याचं सांगताना दिसत आहे. अर्जुन म्हणजे अभिनेता अमित भानुशाली म्हणाला, “आमचं ‘मितवा’ गाणं आहे. खूप छान, सुंदर, रोमँटिक गाणं आहे. सध्या मालिकेत सायली-अर्जुनची एक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्या नात्याला हे शोभून गाणं आहे. तुम्हाला आमचा डान्स खूप आवडणार आहे.”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीच्या नवऱ्याने केला मच्छीचा बेत, पोस्ट शेअर करत म्हणाली, “सुगरण नवरा…”

या व्हिडीओवर, नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. आनंदी-सार्थकच्या संगीत सोहळ्यातील सायली-अर्जुनचा डान्स पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं चाहत्यांनी सांगितलं आहे.

Story img Loader