Tharla Tar Mag New Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-प्रियाचे लग्नविधी सुरू असताना लग्नमंडपात अचानक सायली येते असा सीक्वेन्स चालू आहे. सायली बॅण्डवाल्याच्या रुपात लग्नात एन्ट्री घेणार आहे. तिला अचानक आलेलं पाहून सगळेजण विचारत पडतात. सर्वप्रथम सायली सर्वांसमोर कृतज्ञता व्यक्त करते आणि त्यानंतर अर्जुनवर प्रेम असल्याचं भर मांडवात मान्य करते. बायकोचे शब्द ऐकताना अर्जुन देखील आनंदी होतो. पण, घरातल्यांसमोर त्याचं काहीच चालत नाही. कल्पना सायलीला, ‘ताबडतोब इथून निघून जा’ अशी ताकीद देते. पण, सायली असं करत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“गेल्यावेळी तुमच्या विनंतीचा मान देऊन मी निघून गेले पण, आता असं होणार नाही आई…” असं सायली कल्पनाला सांगते. सायलीचे शब्द ऐकून अर्जुन आणखी भारावून जातो. शेवटी सायली सर्वांसमोर अर्जुनला, “तुमचं तन्वीवर ( प्रिया ) प्रेम आहे का?” असं विचारते. यावर अर्जुन नकार दर्शवतो. यामुळे केवळ पूर्णा आजीच्या हट्टाखातर अर्जुन प्रियाशी लग्न करण्यास तयार झालाय हे सत्य सर्वांसमोर येतं.

सायलीला पाहून प्रिया खूपच संतापते. “सिक्युरिटी गार्ड्स बोलावून घ्या आणि आताच्या आता या सायलीला बाहेर काढा” असा आदेश प्रिया देते. तिच्या म्हणण्यांनुसार काहीजण आतही येतात. पण, याचा काहीच उपयोग होत नाही. शेवटी अर्जुन सर्वांना ओरडून, “माझ्या बायकोला कोणीही हात लावायचा नाही” असं सांगतो. यानंतर सिक्युरिटी गार्ड्स निघून जातात. आता सायली-अर्जुनच्या मदतीला घरातील आणखी एक सदस्य पुढे येणार आहे. ही व्यक्ती म्हणजे प्रतिमा.

अर्जुन-तन्वी लहान असताना पूर्णा आजीला प्रतिमाने दोघांच्या लग्नाचं वचन दिलं असतं. पण, “आता हे वचन मला आठवत नसल्याने कृपा करून या वचनातून मला मुक्त कर” असं प्रतिमा पूर्णाईला सांगते. याशिवाय दुसरीकडे अर्जुन प्रियाला, “ताबडतोब तुझा तमाशा बंद कर…मी इतके दिवस सहन केलं पण आता यापुढे नाही. आता मी लग्न करेन माझ्याच बायकोशी” असं सांगतो. यावेळी अर्जुन सायलीसला घेऊन थेट लग्नविधींसाठी बसतो. अशारितीने मालिकेत सायली-अर्जुनचं लग्न होणार आहे.

दरम्यान, ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या दिवशी हा खास भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ठरलं तर मग’ मालिका आता १० फेब्रुवारीपासून रात्री ८.१५ ते ९ वाजेपर्यंत या नव्या वेळेत प्रसारित केली जाते.