Tharla Tar Mag Maha Episode Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अर्जुन-सायलीमध्ये कुटुंबीयांमुळे दुरावा आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. प्रियाने मोठा कट रचून सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं सुभेदार कुटुंबीयांसमोर उघड केलं. यामुळे कल्पना चिडून सायलीला घराबाहेरचा रस्ता दाखवते. सायलीला घराबाहेर काढल्यावर अर्जुन प्रचंड अस्वस्थ होतो. इतकंच नव्हे तर सायलीच्या सगळ्या आठवणी घरातून पुसून टाकण्याचा प्रयत्न प्रिया करते. तिचं राहिलेलं सगळं सामान चैतन्यमार्फत घराबाहेर काढलं जातं. हे सगळं पाहून अर्जुन प्रचंड संतापतो.

एकीकडे सुभेदारांच्या घरी या सगळ्या घटना सुरू असताना दुसरीकडे, मधुभाऊ सुद्धा सायलीकडून यापुढे अर्जुनच्या संपर्कात राहायचं नाही असं वचन घेतात. अर्जुन भर एसटी स्टॅण्डवर गुडघ्यावर बसून सायलीला प्रपोज करतो पण, तरीही मधुभाऊंना दिलेल्या वचनामुळे सायली त्याला काहीच उत्तर देत नाही. मिसेस सायलीने आपल्याला काहीच उत्तर का दिलं नाही? असा प्रश्न अर्जुनला सुद्धा पडतो. सध्या आपल्या बायकोला भेटण्यासाठी अर्जुन वारंवार चाळीत म्हणजेच मधुभाऊंच्या घरी येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Fans and netizens reaction on tejashri Pradhan exit from premachi goshta serial
“खूप वाईट वाटतंय..”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील तेजश्री प्रधानच्या एक्झिटवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “तुझा निर्णय…”
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”
Jitendra Awhad, Mumbra Marathi case, Mumbra ,
मुंब्रा मराठी प्रकरणावर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लहान मुलांच्या वादाला…”
Image of Allahabad High Court
“पत्नीने अनैतिक संबंध न ठेवता इतरांना भेटणं म्हणजे…”, २३ वर्षांपासून वेगळं राहणार्‍या पती-पत्नीला घटस्फोट देताना न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

हेही वाचा : सैफ अली खान ‘आऊट ऑफ डेंजर’! अभिनेत्याची शस्त्रक्रिया करणारे मराठमोळे डॉ. नितीन डांगे आहेत तरी कोण? मध्यरात्री केली धावपळ

अर्जुन भाजीवाल्याकडे सायलीसाठी चिठ्ठी पाठवतो, इतकंच नव्हे, तर पुढची संक्रांत मी आणि मिसेस सायली एकत्र साजरी करतो असं वचन सुद्धा तो मधुभाऊंना देतो. या सगळ्यात आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेचा महाएपिसोड येत्या १९ जानेवारीला प्रसारित केला जाणार आहे.

महाएपिसोडमध्ये काय घडणार?

‘ठरलं तर मग’ मालिकेत गुंडांशी मारामारी करताना अर्जुन दिसेल. अर्जुनला झालेल्या जखमा पाहून सायलीचा जीव कासावीस होतो. ती मधुभाऊंना विनंती करून मला त्यांच्याजवळ जाऊद्या… असं सांगत असते. पण, मधुभाऊंनी सायलीचा हात धरलेला असतो. इतक्यात, गुंड अर्जुनवर मागून वार करतात. यामुळे त्याची शुद्ध हरपते आणि तो खाली पडतो. अर्जुनला या अवस्थेत पाहून सायली प्रचंड अस्वस्थ होते…ती पटकन मधुभाऊंचा हात झटकते आणि अर्जुनकडे जाते.

हेही वाचा : ३ दिवस ७५ लोकांच्या युनिटने गोविंदाची स्वित्झर्लंडमध्ये शूटिंगसाठी पाहिलेली वाट; प्रसिद्ध दिग्दर्शक खुलासा करत म्हणालेले, “३ दिवसानंतर…”

शुद्ध हरपलेल्या अर्जुनला ती म्हणते, “अर्जुन सर माझं पण तुमच्यावर खूप प्रेम आहे.” बायकोचे हे शब्द ऐकून अर्जुन पटकन शुद्धीवर येतो आणि तिला मिठीत घेतो. ‘ठरलं तर मग’ मालिकेत आता खऱ्या अर्थाने सायली-अर्जुनच्या लव्हस्टोरीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader