Tharla Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायलीने आपल्या प्रेमाची कबुली अर्जुनसमोर दिल्याचा सीक्वेन्स चालू आहे. गेल्या काही दिवसांपासून मधुभाऊंच्या वचनामुळे सायली-अर्जुनमध्ये दुरावा निर्माण झाला होता. मात्र, सायली कोल्हापूरला जायला निघाल्यावर अर्जुनने तिला एसटी स्टँडवर गुडघ्यावर बसून प्रपोज केल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी मधुभाऊंच्या वचनामुळे सायली अर्जुनला काहीच उत्तर न देता निघून गेली होती. पण, नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात तिने आपल्या मनातलं प्रेम व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुंडाशी मारामारी करताना अर्जुनवर मागून वार करण्यात येतो. यामुळे तो तोल जाऊन जमिनीवर कोसळतो. नवऱ्याची ही अवस्था पाहून सायली प्रचंड अस्वस्थ होते. ती मधुभाऊंचा हात झटकून अर्जुनजवळ जाते. त्याला उठवण्याचा प्रयत्न करते…शेवटी सायली म्हणते, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे अर्जुन सर… बायकोच्या तोंडून हे वाक्य ऐकताच अर्जुन अलगद डोळे उघडतो. त्याचा आनंद पार गगनात मावेनासा होतो.

एकीकडे अर्जुन-सायलीचं नातं बहरत असताना दुसरीकडे, सुभेदारांच्या घरी जाऊन प्रिया त्यांचे सायलीविरोधात कान भरते. यामुळे लवकरात लवकर अर्जुनला सायलीपासून दूर करुन तन्वी ( प्रिया ) आणि अर्जुनचं लग्न लावून द्यायचं असा निर्णय पूर्णा आजी घेते. या निर्णयाबद्दल ती अर्जुनला सांगते. पण, अर्जुन येत्या भागात प्रियाबरोबर लग्न करण्यास स्पष्ट नकार देणार असल्याचं पाहायला मिळेल.

प्रियाबरोबर लग्न करणार नाही असा ठाम निर्णय अर्जुन कुटुंबीयांना सांगतो. पूर्णा आजीने अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचा घाट घातल्याची बातमी आता सायलीपर्यंत पोहोचणार आहे. कुसुमबरोबर याविषयावर चर्चा करताना सायली एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे.

सुभेदारांच्या घरासाठी प्रिया अजिबात योग्य मुलगी नाही. त्यामुळे ठरलं तर मग मी माझ्या नवऱ्याशी पुन्हा एकदा लग्न करणार…अर्थात, आधी दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्याने आता अर्जुनबरोबरच पुन्हा लग्न करण्याचा निर्णय सायलीने घेतला आहे. मालिकेचा हा विशेष भाग २७ जानेवारीला प्रसारित केला जाईल.

दरम्यान, आता सायली आणि अर्जुन कसं लग्न करणार, सुभेदार कुटुंबीय यावर काय निर्णय घेणार या सगळ्या गोष्टी मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharla tar mag sayali plans to re marry with arjun watch new promo sva 00