अभिनेत्री जुई गडकरी व अभिनेता अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे. मालिकेतील अर्जुन-सायलीची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीस पसंतीस पडली आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं आहे. त्यामुळे मालिका टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. अनेक लोकप्रिय मालिकांना मागे टाकून ‘ठरलं तर मग’ मालिकेने रेकॉर्ड ब्रेक टीआरपी केला आहे. अशातच आणखी एका स्पर्धेत या मालिकेने बाजी मारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘या’ गोड चिमुकलीला ओळखलंत का? रातोरात झाली होती सुपरस्टार

संगीत, मस्ती अन् धिंगाणा यांचा मेळ असलेला ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाचं दुसरं पर्व नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव होस्ट करत असलेला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या घराघरातच नाही तर मनामनातही पोहोचला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात ‘ठरलं तर मग’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील कलाकारांमध्ये सांगितिक लढत पाहायला मिळाली.

हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानने शुभांगी गोखलेंची केली नक्कल; पाहा व्हिडीओ

पहिल्या पर्वाप्रमाणे दुसऱ्या पर्वातही धून टाक, बोबडी वळाली, रेखाटा पटापट, साडे माडे शिंतोडे या चार फेऱ्या पाहायला मिळाल्या. या चार फेऱ्यांपैकी तीन फेऱ्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने जिंकल्या आणि त्यांना घंटाघरात जायची संधी मिळाली. यावेळी घंटाघरात पहिल्यांदा ‘ठरलं तर मग’च्या टीममधून महिपत म्हणजे अभिनेते मयूर खांडगे यांना पाठवण्यात आलं होतं. त्यांनी पहिल्याच फटक्यात १० हजार रुपये आणले. त्यानंतर घंटाघरात अस्मिता म्हणजे मोनिका दबडे आणि अर्जुन म्हणजे अमित भानुशाली गेला. यावेळी मोनिकाने ५० हजार तर अमितने १०४ रुपये आणले. तसेच घंटाघरात ‘प्रेमाची गोष्ट’च्या टीमला देखील जाण्याची संधी मिळाली होती. माधवी म्हणजे शुभांगी गोखले यांना घंटाघरात पाठवण्यात आलं होतं. पण त्यांनी मोठ्या रक्कमे ऐवजी शून्य आला. यामुळे ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या दुसऱ्या पर्वातील पहिल्या भागात ‘ठरलं तर मग’ या मालिकेने बाजी मारली.

हेही वाचा – “त्यांचे आई-वडील आमच्यासारखे म्हातारे होण्याआधीच वरती…” ऐश्वर्या नारकर यांचं ट्रोलर्सना उत्तर, म्हणाल्या…

दरम्यान, ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पुढच्या भागात ‘मन धागा धागा जोडते नवा’ आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतील कलाकार सहभागी होणार आहेत. आता या दोन मालिकांमध्ये कोण ही सांगितिक लढत जिंकत? हे येत्या काळात समजेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharla tar mag serial won aata hou de dhingana season 2 first episode pps
Show comments