Tharla Tar Mag TRP : ‘ठरलं तर मग’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अर्जुन-सायलीच्या लग्नाचा सीक्वेन्स चालू होता. खरंतर प्रिया अर्जुनशी लग्न करण्यास उत्सुक असते पण, ऐनवेळी सायली लग्नमंडपात एन्ट्री घेऊन आपल्याच नवऱ्याशी पुन्हा एकदा लग्न करते. यावेळी प्रतिमा सायलीला खंबीरपणे साथ देते असं मालिकेत पाहायला मिळालं. हा एपिसोड गेल्या आठवड्यात १४ फेब्रुवारीला प्रसारित करण्यात आला. मालिकेत मोठा ट्विस्ट आला असल्याने प्रेक्षकांचा या ट्रॅकला भरभरून प्रतिसाद मिळाला. या सीक्वेन्ससाठी सगळ्या टीमने दिवस-रात्र मेहनत घेतली होती. याची पोचपावती म्हणून एक आनंदाची बातमी ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या संपूर्ण टीमला मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दर आठवड्यात गुरुवारी टीआरपीची आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. यामुळे गेल्या ७ दिवसात मालिकांना मिळालेला प्रतिसाद, स्लॉट लीडर कोणत्या मालिका ठरल्यात याचा अंदाज प्रेक्षकांसह वाहिनीला येतो. गेली दोन वर्षे ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत अधिराज्य गाजवत होती. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून या मालिकेचा टीआरपी काहीसा कमी झाला होता. आता संपूर्ण टीमने दमदार कमबॅक करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या प्रेक्षकांनी ट्विस्टने परिपूर्ण अशा सायली-अर्जुनच्या लग्नाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच ‘ठरलं तर मग’ मालिकेला ७ हा रेकॉर्ड ब्रेकिंग टीआरपी मिळाला आहे. सध्याच्या काळात टीव्ही मालिकेला टीआरपीत ७ रेटिंग्ज मिळणं ही मोठी गोष्ट समजली जाते.

ऐतिहासिक टीआरपी नोंदवल्यामुळे आता ‘ठरलं तर मग’ महाराष्ट्राची महामालिका ठरली आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून मालिकेची वेळ सुद्धा बदलण्यात आली आहे. पूर्वी ही मालिका रात्री ८:३० ला प्रसारित केली जायची. मात्र, आता मालिका ८.१५ ला म्हणजेच रोज जवळपास पाऊणतास प्रसारित केली जाते. बदललेली वेळ, सायली-अर्जुनचं लग्न या सगळ्या गोष्टी टीआरपीमध्ये सकारात्मक वाढ होण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत.

प्रतिमा साकारणाऱ्या शिल्पा नवलकर यांची पोस्ट ( Tharla Tar Mag TRP )

दरम्यान, सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सगळ्याच कलाकारांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आता अर्जुन-सायलीला नवरा-बायको म्हणून विशेषत: सायलीला ‘सुभेदारांची सून’ म्हणून सुभेदार कुटुंबीय केव्हा स्वीकारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.