Tharla Tar Mag Fame Actress Jui Gadkari : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-सायलीमध्ये दुरावा आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. इतकंच नव्हे तर सायलीला सासूबाई कल्पनाने सुभेदारांच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर, दुसरीकडे मधुभाऊंनी सुद्धा अर्जुनशी संपर्क साधायचा नाही असं वचन सायलीकडून घेतलेलं आहे. त्यामुळे आता काही करुन सासरेबुवांचं मन पुन्हा एकदा जिंकायचं असा निश्चय अर्जुनने केल्याचं मालिकेत पाहायला मिळत आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. या दोन वर्षात मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच अधिराज्य गाजवलं. ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या आकडेवारीत कायम पहिल्या स्थानी असते. यावरुन या मालिकेचा चाहतावर्ग किती मोठ्या प्रमाणात आहे याचा अंदाज आपल्याला येतो. याशिवाय मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार्‍या कलाकारांना सुद्धा आता पुढे काय घडणार यासंदर्भातले प्रश्न विचारले जातात.

Marathi Actress Tejashri Pradhan exit from Premachi goshta marathi serial
तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट! आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Rohit Roy recalls surprising daughter Kiara
अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”
Tejashri Pradhan First Post Share after exit premachi goshta serial
“काही वेळेला बाहेर पडणं…”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला रामराम केल्यानंतर तेजश्री प्रधानची पहिली पोस्ट, म्हणाली, “तुमची कुवत…”
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
kartiki gaikwad brother kaustubh announce engagement
कार्तिकी गायकवाडच्या भावाचं लग्न ठरलं! होणार्‍या पत्नीसह शेअर केला पहिला फोटो, कौस्तुभने गायली आहेत ‘ही’ लोकप्रिय गाणी
Tejswini Pandit
“लवकर बरं व्हायचं आहे”, तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय? पोस्टवर स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधवने केल्या कमेंट्स
tharala tar mag sayali slaps priya watch promo
प्रियाला सणसणीत कानाखाली वाजवणार सायली! घटस्फोटाचं कारस्थान होणार उघड; दाखवला ‘तो’ पुरावा, पाहा जबरदस्त प्रोमो

हेही वाचा : मर्सिडीज खरेदी करुन रुपाली भोसलेने नेटकऱ्याची केली बोलती बंद! गाडीवरून ट्रोल करणाऱ्याला ७ आठवड्यांपूर्वीच दिलेलं उत्तर

जुई गडकरीने नेटकऱ्याला दिलं स्पष्टीकरण

‘ठरलं तर मग’मध्ये ( Tharla Tar Mag ) सायलीची मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यावेळी तिला एका चाहत्याने मालिकेसंदर्भातला प्रश्न विचारला. “‘ठरलं तर मग’ मालिकेत लीप ( काही वर्षे कथानक पुढे सरकणे ) येणार आहे का? याविषयी अनेक अफवा सध्या कानावर येत आहेत.”

नेटकऱ्याच्या प्रश्नावर जुई म्हणाली, “त्या सगळ्या अफवाच आहेत. अशा बातम्यांवर कृपया विश्वास ठेऊ नकात. ‘ठरलं तर मग’ मालिका बंद होणार, कलाकारांनी मालिका सोडली, मालिकेत लीप येणार आणि वगैरे वगैरे… या सगळ्या अफवा आहेत. मी सध्या इतकंच सांगू शकते मालिकेत लवकरच मोठं काहीतरी घडणार आहे.”

हेही वाचा : “लवकर बरं व्हायचं आहे”, तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय? पोस्टवर स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधवने केल्या कमेंट्स

Tharla Tar Mag
‘ठरलं तर मग’ जुई गडकरीने घेतलं आस्क मी सेशन ( Tharla Tar Mag Jui Gadkari )

हेही वाचा : तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट! आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री

दरम्यान, जुईची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’ ( Tharla Tar Mag ) मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर दररोज ८.३० वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये जुईसह, अमित भानुशाली, प्रियांका तेंडोलकर, प्राजक्ता दिघे, ज्योती चांदेकर, मोनिका दबडे, केतकी विलास अशा बऱ्याच कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिता साकारल्या आहेत.

Story img Loader