Tharla Tar Mag Fame Amit Bhanushali Birthday Celebration : ‘ठरलं तर मग’ मालिका गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेने सुरू झाल्यापासून टीआरपीच्या शर्यतीत आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. ‘ठरलं तर मग’मध्ये जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांच्या मुख्य भूमिका आहेत. अर्जुनची भूमिका साकारणाऱ्या अमितचा ( २८ जानेवारी ) आज वाढदिवस आहे. अमितच्या वाढदिवसानिमित्त आज ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमित भानुशालीच्या वाढदिवसाला टीमने खास तयारी केली होती. यावेळी अभिनेत्याने केक कापला, आपल्या सहकलाकारांसह अमितने वाढदिवस साजरा केला. यावेळी ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेचे कलाकार सुद्धा उपस्थित होते. “आयुष्यात पहिल्यांदाच इतका मोठा वाढदिवस साजरा केला” असं सांगत अभिनेत्याने यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. अमितच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे सध्या बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटला सर्वत्र रोषणाई केल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून प्रेक्षकांना एक महत्त्वाची हिंट मिळते.

प्रियाचा नेहमीपेक्षा वेगळा लूक, सुभेदारांच्या घरात लगीनघाई

‘ठरलं तर मग’ मालिकेत आता लवकरच लग्नसराई सुरू होणार आहे. यानिमित्ताने सुभेदारांच्या अन्नपूर्णा निवासमध्ये विशेष तयारी करण्यात आली आहे. याशिवाय अमितच्या वाढदिवसाच्या व्हिडीओमध्ये आणखी गोष्ट लक्ष वेधून घेते ती म्हणजे प्रियाचा लूक. मालिकेची खलनायिका प्रिया नेहमीपेक्षा काहीशा वेगळ्या लूकमध्ये या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय. अर्जुनशी लग्न करणार असल्याने ती नववधूच्या रुपात पाहायला मिळतेय.

गुलाबी रंगाचा ड्रेस, गळ्यात नेकलेस, हातात मॅचिंग बांगड्या हा लूक प्रियाने लग्नसराईसाठी केला आहे. तर, सायलीने या व्हिडीओमध्ये निळ्या रंगाची साडी नेसल्याचं दिसतंय. अर्जुन आणि सायलीने Twinning केलं आहे. त्यामुळे आता ऐनवेळी प्रियाला बाजूला करून सायली आपल्याच नवऱ्याशी कसं लग्न करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रोज रात्री ८.३० वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये जुई आणि अमितसह प्रियांका तेंडोलकर, मोनिका दबडे, दिशा दानडे, ज्योती चांदेकर, प्राजक्ता दिघे, शिल्पा नवलकर या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharla tar mag team celebrated amit bhanushali birthday on set villain priya new look grabs attention watch now sva 00