‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यामुळे मालिका सुरू झाल्यापासून टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ठाण मांडून बसली आहे. ‘स्टार प्रवाह’वरील अनेक लोकप्रिय मालिकांना या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत मागे टाकलं आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार आता घराघरात पोहोचले आहे. अर्जुन-सायलीची जोडी प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडली आहे. अशातच आता मालिकेमध्ये अर्जुन-सायलीमधलं नातं बहरताना दिसणार आहे. तसेच लवकरच दोघांचे रोमँटिक सीन पाहायला मिळणार आहेत. मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडणार आहे? हे थोडक्यात जाणून घ्या
हेही वाचा – “अंगावरचे कपडे काढून देणारा माणूस” अशोक सराफ यांनी सांगितला नाना पाटेकरांबरोबरच्या मैत्रीचा किस्सा, म्हणाले…
कोर्टातील अर्जुनने केलेला युक्तिवाद पाहून सायली खूप खुश होते. मधुभाऊंच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सायली अर्जुनचे वेगळ्या पद्धतीने आभार व्यक्त करण्याचे ठरवते. त्यामुळे सायली सध्या अर्जुनच्या आवडीच्या गोष्टी करताना पाहायला मिळत आहे. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला अर्जुनला आइस्क्रीम खाण्याची इच्छा होते, म्हणून तो ऑनलाइन ऑर्डर करायला जातो. पण तितक्यात सायलीच आइस्क्रीम आणून देते. हे पाहून अर्जुन सुखद धक्का बसतो. “मला आइस्क्रीम हवंय हे तुम्हाला कसं कळालं?” असं विचारतो. तेव्हा सायली म्हणते, “तुमच्याबरोबर सहा महिने राहतेय. त्यामुळे आता मला तुमच्या आवडी-निवडी कळायला लागल्यात. शिवाय मला तुमच्या मनात काय सुरू असतं हे देखील कळायला लागलंय.”
यानंतर अर्जुन सायलीची थोडीशी परीक्षा घ्यायची ठरवतो. सायलीला विचारतो, “मला आइस्क्रीम खायला कधी आवडतं? हे सांगा.” यावर सायली म्हणते, “जेव्हा तुम्ही मसालेदार जेवण जेवता, तेव्हा तुम्हाला आइस्क्रीम खायला आवडतं. आणि तुमच्या एका डॉक्टर मित्राने सांगितलंय, मसालेदार जेवण जेवल्यानंतर आइस्क्रीम खाल्लं तर मसाले बादत नाहीत.” हे ऐकून अर्जुनला पुन्हा आश्चर्याचा धक्काच बसतो. त्याला आधी वाटतं त्याच्या आईने सायलीला हे सांगितलं असावं. पण त्यानं ही गोष्ट कधीच आईला सांगितली नसते. मग सायलीला याबाबत कसं माहित पडलं? असा अर्जुन तिला प्रश्न विचारतो. तेव्हा सायली म्हणते की, “कान आणि डोळे उघडे ठेवले तर भरपूर गोष्टी शिकता येतात. आणि मी गेले सहा महिने तेच करतेय.”
हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीला ‘नवरा मिळाला’; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
कोर्टातून आल्यापासून सायली अर्जुनच्या आवडीचं सर्व काही करत असते. हे लक्षात घेऊन अर्जुन तिला पुन्हा विचारतो की, “तुम्ही हे माझ्यासाठी एवढं सगळं का केलंत?” तर सायली म्हणते, “ही माझी आभार मानायची पद्धत आहे, असं समजा. तुम्ही कोर्टामध्ये जे काही केलंय त्याच्यासाठी मी या छोट्याछोट्या गोष्टी करुच शकते ना? तुम्ही कोर्टात जे काही केलंय, त्यामुळे मधुभाऊ लवकरच सुटतील असं वाटू लागलं आहे.”
असं सर्व एकाबाजूला सुरू असताना साक्षी आणि महिपती चैतन्यला आपल्या जाळ्यात अडकवून अर्जुनच्या पुढच्या खेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण चैतन्य काहीच केसबद्दल बोलत नाही. तसेच दुसऱ्याबाजूला कोर्टात घडलेल्या सर्व प्रकारमुळे प्रिया बिथरुन जाते. तिला जन्मठेपेची शिक्षा होते. रविराज तिच्या कानाखाली मारतो, अशी स्वप्न तिला पडू लागतात.
हेही वाचा – “जो भी होगा देखा जायेगा” म्हणत एव्हरग्रीन नारकर कपलनं नवा व्हिडीओ केला शेअर; नेटकरी म्हणाले…
तसेच मालिकेत दुसऱ्या दिवशी पेस्ट कंट्रोलसाठी बुकिंग केलेले कर्मचारी घरी न आल्यामुळे सायली आणि विमल साफसफाई करत असतात. पण तितक्यात अस्मि येऊन सायलीला एकट पाडण्यासाठी विमलला ती स्वतःसाठी लिंबू सरबत बनवायला लावते.
मात्र कल्पना विमलला थांबवून अस्मिला स्वतःच लिंबू सरबत घ्यायला लावते. यावेळी अस्मि आणि सायलीला किचनमध्ये झुरळ दिसत. यामुळे तारांबळ उघडते. त्यांचा आराडओरडा ऐकून घरातले सर्वजण बाहेर येतात. तेव्हा सायली आणि अस्मि झुरळाला घाबरून किचनच्या ओट्यावर चढलेल्या असतात.
हेही वाचा – “आई-बाबा दोघेही गेले…”; अभिनेते अजिंक्य देव यांची नवी पोस्ट, रमेश देव आणि सीमा देव यांचे जुने फोटो केले शेअर
पण पूर्णा आजी दोघींना ओरडल्यानंतर त्या खाली उतरतात. मात्र तितक्यात पुन्हा त्यांना झुरळ दिसत. तेव्हा सायली घाबरून जोरात धावत अर्जुनला घट्ट मिठ्ठी मारते, असं पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे आता दोघांना एकमेकांच्या स्पर्शातील गोडवा जाणवेल का? हे येत्या काळात समजेल.