अभिनेता सुयश टिळक सध्या ‘अबोली’ मालिकेमुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याने साकारलेली सचित राजेची भूमिका प्रेक्षकांना अल्पावधीत पसंतीस उतरली आहे. कारण सुयशने साकारलेली भूमिका सचितची असली तरी तो आतापर्यंत वेगवेगळ्या रुपात झळकला आहे. कधी वृद्धाच्या रुपात तर कधी स्त्रीवेशात पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत सुयश १० रुपात दिसला आहे. त्यामुळे प्रेक्षक त्याचं कौतुक करत आहेत. नुकतंच सुयशने ‘अबोली’मधील सचितची भूमिका स्वीकारण्यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे.

हेही वाचा – ‘अबोली’ मालिकेत नुकतीच एंट्री झालेल्या सुयश टिळकने सांगितला नऊवारी साडी नेसण्याचा अनुभव; म्हणाला, “स्त्रिया…”

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Bashar al-Assad
Bashar al-Assad: सीरियाचा नेता की क्रूर राजवटीचा चेहरा? बशर अल-असद कोण आहे?
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”

हेही वाचा – Video: कुशल बद्रिकेने सोनाली कुलकर्णीवर केला विनोद अन् एकच हशा पिकला; पाहा व्हिडीओ

‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलशी नुकताच अभिनेता सुयश टिळकने संवाद साधला. तेव्हा तो म्हणाला, “मला या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हाच मला माहित होतं की हे काम कठीण आहे. म्हणून मी हे आव्हान स्वीकारलं. कारण आव्हान जर कठीण नसेल तर कामात काय गंमत. त्यामुळे जेव्हा भूमिका स्वीकारली तेव्हाच माझ्या मनाची तयारी झाली होती की, हा प्रवास कठीण जाणार आहे. त्यामुळे मी हे काम करण्यासाठी सज्ज झालो.”

हेही वाचा – Video: रोनाल्डोने सलमान खानकडे केलं दुर्लक्ष, नेटकरी म्हणाले, “आता याचं करिअर…”

पुढे सुयश म्हणाला की, “सचित राजेची भूमिका स्वीकारल्यामुळे मी खूप आनंदी आहे. कारण मला कंफर्ट झोनच्या बाहेर काढणारी ही भूमिका आहे. वेगवेगळी रुपं आहेत. त्यामुळे मी ‘अबोली’ मालिका स्वीकारली. कारण सोप काम असेल तर मज्जा नाही. आतापर्यंत मी १० रुपात दिसलो आहे आणि यापुढेही आणखी वेगवेगळ्या रुपात दिसणार आहे.”

Story img Loader