‘कलर्स मराठी’वरील ‘ढोलकीच्या तालावर’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. १२ लावण्यवंतींनी आपल्या दिलखेच अदांनी आणि नृत्य कौशल्याने परीक्षकांबरोबर प्रेक्षकांची देखील मनं जिंकली. या १२ लावण्यवंतीपैकी एका व्यक्तीनं मात्र प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप कायम मिळवली. हा व्यक्ती म्हणजे शुभम बोराडे. लावणी हाच ध्यास असलेला बीडचा लावणी प्रिन्स शुभम बोराडे हा ‘ढोलकीच्या तालावर’चा प्रथम उपविजेता ठरला. तर कोकण कन्या नेहा पाटील ही विजेती ठरली. पण या निकालावर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत.
‘ढोलकीच्या तालावर’चा महाअंतिम सोहळा रविवारी (१ ऑक्टोबर) मोठ्या दिमाखात पार पडला. समता आमणे, नम्रता सांगुळे, पूर्वा साळेकर, तनुजा शिंदे, शुभम बोराडे आणि नेहा पाटील या सहा लावण्यावंती महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचल्या होत्या. यातील नेहा पाटीलला विजेती म्हणून घोषित करण्यात आलं. तर शुभम बोराडे प्रथम उपविजेता ठरला आणि नम्रता सांगुळे ही द्वितीय उपविजेती ठरली. पण हा निकाल चुकीचा दिल्याच प्रेक्षकांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – ‘या’ चिमुकल्यांना ओळखलंत का? एक आहे मराठीतील आघाडीची अभिनेत्री तर दुसरी भारतातील प्रसिद्ध खेळाडू
‘कलर्स मराठी’नं शुभम बोराडेच्या केलेल्या पोस्टवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. “शुभम हाच खरा विजेत आहे”, “आमच्या दृष्टीनं शुभम उपविजेता नाही तर प्रथम विजेताच आहे”, “शुभम तुझा पहिला नंबर यायला पाहिजे होता. तू खूप छान नाचतोस”, “शुभम बोराडेच विजेता पाहिजे होता. निकाल चुकीचा दिला आहे. आम्ही तुमच्या निकालाशी सहमत नाही,” अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत.
हेही वाचा – “मी लग्न केलं…” केतकी माटेगावकरचा खुलासा, म्हणाली, “माझा पहिला नवरा…”
हेही वाचा – केतकी माटेगावकरची आहेत मजेशीर टोपण नावं; अभिनेत्री म्हणाली…
दरम्यान, गेल्या १० वर्षांपासून शुभम विविध कार्यक्रमांमध्ये लावणी सादर करतोय. मुलींना सुद्धा लाजवेल अशी त्याची मनमोहक अदाकारी आणि नृत्य आहे. त्यामुळे तो ‘ढोलकीच्या तालावर’च्या प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत बनला होता. सुरुवातीपासून शुभमचं विजेता होईल असं प्रेक्षकांचं मत होतं. पण नेहा पाटील हिने बाजी मारली.