कपिल शर्माच्या शोमध्ये लहान लहान भूमिका करणाऱ्या एका कॉमेडियनने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्युनियर अभिनेता तीर्थानंदने फेसबुकवर लाइव्ह येत फिनाईल प्यायले. त्याचं फेसबुक लाइव्ह बघणाऱ्या सोशल मीडियावरील काही मित्रांनी जवळच्या पोलीस ठाण्यात फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अभिनेत्याला रुग्णालयात नेलं.
पोलीस हवालदार मोरे यांनी आज तकला दिलेल्या माहितीनुसार, “फोन आल्यानंतर आम्ही थेट मीरा रोड येथील शांती नगरमधील इमारतीत पोहोचलो. तीर्थानंदच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा होता आणि खोलीत एक कुत्रा देखील होता. आत पाहिलं असता तीर्थानंद शुद्धीवर नव्हता, आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केलं.”
“आता फक्त आठवणीतच…”, शशांक केतकरचा वडिलोपार्जित वाडा पाडला जाणार; म्हणाला, “एका घराऐवजी…”
दरम्यान, तीर्थानंदने आत्महत्येसारखं पाऊल का उचललं याबद्दल त्याने फेसबुक लाइव्हमध्ये सांगितलं. त्याने एका महिलेला त्याच्या या अवस्थेसाठी जबाबदार ठरवलं आहे. तीर्थानंदने दिलेल्या माहितीनुसार, “मी काही महिन्यांपूर्वी एका महिलेला भेटलो. तिला दोन मुली आहेत. आम्ही दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत होतो. रिलेशनशिप दरम्यान मला समजले की ती देहविक्री व्यवसाय करते. मला तिच्यापासून वेगळं व्हायचं होतं. पण, तिने मला धमक्या देण्यास सुरुवात केली, माझ्यावर गुन्हाही दाखल केला. पोलिसांच्या भीतीने मी बऱ्याच दिवसांपासून घरातून पळून जात आहे. बरेच दिवस मी माझ्या घरी गेलेलो नाही, मला फूटपाथवर झोपावं लागलं. मी या गोष्टीला कंटाळलो आहे आणि त्यामुळेच मला आत्महत्या करायची इच्छा आहे.”
हेही वाचा – Video: “गमावलं ना मी तुला”! मराठी अभिनेत्रीचा भीषण अपघात, कारचा झाला चेंदामेंदा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
तीर्थानंद नाना पाटेकर यांच्यासारखा दिसतो. सोशल मीडियावरही त्याचे नाव ज्युनियर नाना पाटेकर आहे. त्याने नाना पाटेकर यांचा बॉडी डबल म्हणूनही काम केलंय. याशिवाय तीर्थानंद ‘द कपिल शर्मा शो’मध्येही अनेकदा दिसला आहे. त्याने अभिषेक बच्चनसोबत एका चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. मार्चपासून त्याला काम मिळत नसल्याने तो खूप दारू पितोय, अशी माहिती समोर आली आहे.