नाटक, मालिका, चित्रपट या तीनही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या भरतनाट्यम् नृत्यांगणा अश्विनी एकबोटे यांचं २२ ऑक्टोबर २०१६ रोजी निधन झालं. पुण्यातील भरत नाट्य मंदिर येथे ‘नाट्य त्रिविधा’ या कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना तिहाई घेतल्यावर अश्विनी एकबोटे रंगमंचावर कोसळल्या. हृदयविकारच्या झटक्याने त्यांचं वयाच्या ४४व्या वर्षी निधन झालं. आज जरी त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या आठवणी मात्र अविस्मरणीय राहणार आहेत. आज पुण्यतिथी निमित्ताने अश्विनी एकबोटे यांची सून, अभिनेत्री अमृता बने हिने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे.
अश्विनी एकबोटे यांच्या फोटो शेजारी त्यांच्यासारखीच पोज दिलेला फोटो शेअर करत अमृताने पोस्ट लिहिली आहे. अमृताने लिहिलं की, “प्रिय आशुआई, आजचा दिवस कॅलेंडर मधून काढून टाकता तर नाही येणार, पण तुझी आठवण? त्याचं काय? एका दिवसापूर्ती नाही ती…खरं तर तुला कधी भेटता नाही आलं, तुझ्याशी बोलता नाही आलं, तुझं नृत्य म्हणजे तुझा श्वास कधी प्रत्यक्ष पाहता नाही आला. त्याची खंत माझ्या मनात कायम राहील. तुला माहित आहे, आज जिथे तू वावरलीस, तिथे म्हणजे आपल्या घरी जेव्हा जेव्हा मी असते तेव्हा असं वाटतं आशुआईने याच कपाटाला हात लावला असेल ना, याच स्वयंपाकघरात अन्नपुर्णेसारखा सगळ्यांचा पोटोबा शांत केला असेल, याच जिन्यावरून फोटोज काढले असतील…आज त्या प्रत्येक निर्जीव गोष्टीला हाताळताना तू त्याच्यात जो जीव ओतून गेली आहेस त्यामुळे का होईना मला तुला भेटता येतं, तुझ्याशी बोलता येतं.”
हेही वाचा – Video: “बाबांच्या मनात…”, अजिंक्य देव यांनी वडील रमेश देव यांच्या आठवणीत सादर केली सुंदर कविता, पाहा व्हिडीओ
पुढे अमृताने लिहिलं, “तुला माहितीये, लग्नाच्या आधी म्हणजे गेल्या दिवाळीला मी अंधेरीला छान रांगोळी काढली होती. त्यावर शेजारच्या काकू म्हणाल्या, “अरे वाहह, आज तुला शूटिंगला सुट्टी आणि त्यात सुंदर रांगोळी काढली आहेस! मग आता व्हिडीओ कॉल करून दाखवशील ना तुझ्या सासूबाईंना?” ठिकेऽऽऽऽऽ…मला माहीत आहे ती तात्पुरती रांगोळी तुला दाखवता नाही आली, पण शुभंकर आणि मी मिळून आयुष्यभरासाठी जी कायमस्वरूपी संसाराची रांगोळी काढायला घेतली आहे ती नक्कीच तू पाहात आहेस आणि कुठे कुठले रंग भरायचे हे सुद्धा सांगत आहेस.”
“रोज रात्री बाबा, शुभंकर आणि माझा व्हिडीओ कॉल होतो. तेव्हा स्क्रीनवरचा तुझा चौकोन व्हॉट्सअॅप नाही तर आमच्या मनात आहे आणि या व्हिडीओ कॉलला नेहमीच रेंज असेल आशुआई…आणि हो तुझा नादिष्ट शुभंकर सगळं छान सांभाळून घेतोय…बाबा, कुठलीही परिस्थिती असो सगळं सोप्प करून टाकतात ते…जिथे आहेस तिथे छान राहा आणि हो तिथे तरी स्वतःची दगदग करून घेऊ नकोस आशुआई…तुला खूप सारं प्रेम आणि गोड पापा,” अशी सुंदर पोस्ट अमृताने सासूबाई अश्विनी एकबोटे यांच्यासाठी लिहिली आहे.
दरम्यान, अमृता बनेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील काम करत आहे. या मालिकेत तिने मिहिका ही व्यक्तिरेखा साकारली आहे. यापूर्वी तिने ‘कन्यादान’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.