‘बिग बॉस १६’ शोचे स्पर्धक पहिल्या आठवड्यापासूनच प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. आता हा शो खूप रंगतदार होत आहे. कधी या घरात राडे होताना दिसतात तर कधी प्रेमाचे वारे वाहू लागतात. शो मधील सगळे स्पर्धा त्यांच्या खेळामुळे आणि त्यांच्या वागणुकीमुळे आता प्रसिद्ध झाले आहेत. पण त्यातून सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळवलेला स्पर्धक म्हणजे अब्दु रोजिक. पण अब्दुने नुकतीच या घरातून एग्झिट घेतली आहे. सर्वांमध्ये लोकप्रिय असलेला, घरात कधीही वाद न घालणारा अब्दु ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण आता यामागील खरं कारण समोर आलं आहे.

अब्दु रोजिकला ‘बिग बॉस’मधून बाहेर काढल्यामुळे घरातील सर्वच सदस्य हैराण झाले. घराबाहेर पडताना अब्दु सर्वांना मिठी मारून ढसाढसा रडला. अब्दु या शोच्या बाहेर जाण्यामुळे सर्व प्रेक्षकांनाही दुःख नाही. तो ‘बिग बॉस’बाहेर होताच सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. अब्दुला परत आणा अशी मागणी प्रेक्षक सोशल मीडिया वरून करू लागले. मात्र आता अब्दुल स्वतःच्या इच्छेने ‘बिग बॉस’च्या बाहेर पडल्याचं समोर आलं आहे.

FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Bigg Boss 18 Shilpa shinde support to Digvijay singh rathee
Bigg Boss 18: ‘बिग बॉस ११’च्या विजेतीने दिग्विजय राठीला केलं समर्थन; शिल्पा शिरोडकरला म्हणाली…
Bigg Boss 18 Farah Khan warns to rajat dalal on weekend ka vaar
Bigg Boss 18: “…तर तू थेट शो बाहेर होशील”, फराह खानने रजत दलालला चांगलंच झापलं अन् दिली शेवटची ताकीद, म्हणाली, “तू स्वतःला…”
Bigg Boss 18 Shalini Passi entry in salman khan show
Bigg Boss 18: सलमान खानच्या शोची टीआरपीसाठी धडपड, २६९० कोटींची मालकीण शालिनी पासीची घरात एन्ट्री
Bigg Boss 18 Karanveer Mehra Recall Sushant Singh Rajput memories
Bigg Boss 18मधील ‘या’ सदस्याला दारू सोडण्यासाठी सुशांत सिंह राजपूतने केली होती मदत, म्हणाला, “त्याने मला एक डायरी दाखवली…”
Bigg Boss 18 avinash Mishra rajat dalal and Digvijay rathee physical fight for isha singh watch promo
Bigg Boss 18 मध्ये पुन्हा शारिरीक हिंसा, अविनाश मिश्रा-रजत दलाल दिग्विजय राठीच्या अंगावर धावून गेले अन्…; नेमकं काय घडलं?

आणखी वाचा : सब सेटिंग का खेल है! साजिद खानचा स्वतःला ‘बिग बॉस’च्या घराबाहेर जाण्यापासून वाचवण्यासाठी निर्मात्यांशी मोठा करार

एका मीडिया रिपोर्टनुसार, अब्दुच्या मॅनेजमेंट टीमने त्याला ‘बिग बॉस’च्या घराबाहेर येऊ देण्यासाठी निर्मात्यांकडे विनंती केली होती. त्यानंतरच अब्दुला ‘बिग बॉस’बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली. अब्दु रोजिकचा एक नवीन व्हिडीओ गेम प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी त्याचा एक शूटिंग करायचा असल्याने त्याला घराबाहेर पडावं लागलं.

हेही वाचा : Bigg boss 16: अब्दु रोजिक या आठवड्यात जाणार घराबाहेर?, सलमान खानने दिला इशारा

‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यावर अब्दुने सोशल मीडियावर एक लाईव्ह सेशन केलं होतं. या तो ‘बिग बॉस’मध्ये परत येण्याबद्दलही बोलला. तो म्हणाला, “‘बिग बॉस’ एक उत्कृष्ट कार्यक्रम आहे. आय लव ‘बिग बॉस.’ तुम्ही सर्वांनी मला खूप प्रेम दिलंत त्याबद्दल धन्यवाद. मी नक्कीच या शोमध्ये परत येईन.” आता अब्दुलच्या या बोलण्याने चाहतेही खूप खुश झाले आहेत. त्यामुळे आता अब्दुल शूटिंग संपवून कधी ‘बिग बॉस’मध्ये परततो याची सर्वजण वाट पाहत आहेत.

Story img Loader