Marathi Actor New Home : गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी नवीन घर घेत आपली स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं. रोहित माने, धनश्री काडगांवकर, मंगेश देसाई, शिवाली परब, रुपाली भोसले अशा बऱ्याच कलाकारांचा यात समावेश आहे. या यादीत आता आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं आहे. मराठी मनोरंजन विश्वाच्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्याने नुकतीच त्याच्या नव्या घराची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. हा अभिनेता कोण आहे जाणून घेऊयात…

छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. मालिका संपल्या तरीही प्रेक्षक या कलाकारांना विसरत नाही. अभिनेता चेतन वडनेरे देखील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झाला. या मालिकेत त्याने शशांक हे पात्र साकारलं होतं. चेतनने नाशिकमध्ये नुकतंच स्वत:चं नवीन घर ( New Home ) घेतलं आहे. याची खास झलक त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
pune video : 80 years old lady selling panipuri
पुण्यातील ८० वर्षांची आज्जी विकते पाणी पुरी, Viral Video एकदा पाहाच
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो
Brother sister emotional video bride remembered his father at the wedding and crying emotional video goes viral
VIDEO:”जेव्हा वडिलांची जागा भाऊ घेतो” अंगाला हळद लागली पण बघायला बाप नाही, वडिलांचा फोटो घेऊन भावानं काय केलं पाहा

हेही वाचा : अंघोळ करताना फोन, ३ सेकंदात दिला होकार अन्…; अजय देवगणला ‘या’ चित्रपटासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार, म्हणाला…

अभिनेता चेतन वडनेरेने घेतलं नवीन घर

“घर हे माझे आनंदाचे, दाराशी सुरेख नक्षी…नाशिकचं नवीन घर Nashik New Home” असं कॅप्शन देत चेतनने त्याच्या नव्या घराची संपूर्ण झलक चाहत्यांना दाखवली आहे. यामध्ये सुरुवातीलाच चेतनच्या नव्या घराच्या दारावर लावलेली नेमप्लेट सर्वांच लक्ष वेधून घेते. कोणाचंही नाव न लिहिता अभिनेत्याने या नेमप्लेटवर ‘वडनेरे’ हे आडनाव लिहिलं आहे. याला बाजूने फुलांची बॉर्डर करण्यात आलेली आहे. यानंतर चेतनच्या व्हिडीओमध्ये प्रशस्त हॉल, मॉर्डन किचन, बेडरुम यांची झलक पाहायला मिळते.

चेतनने एप्रिल महिन्यात लग्नगाठ बांधत नव्या संसाराला सुरुवात केली होती. लग्नाच्या बरोबर तीन महिन्यांनी नवीन घर घेत अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

हेही वाचा : महाराष्ट्राची हास्यजत्रा : समीर चौघुलेंनी शिवाली परबला दिलं गिफ्ट! कारण आहे खूपच खास, फोटो शेअर करत म्हणाली…

हेही वाचा : तुळजा आणि सूर्याची लग्न मोडण्याची योजना यशस्वी होणार का? ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

chetan vadnere
ठिपक्यांची रांगोळी फेम अभिनेता चेतन वडनेरे व त्याची पत्नी ( New Home )

दरम्यान, चेतनच्या या नव्या घराच्या व्हिडीओवर मराठी कलाकारांसह त्याच्या चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. मेघना एरंडे, गिरीजा प्रभू, गुरु दिवेकर या कलाकारांनी अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओवर खास कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader