स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका घराघरांत लोकप्रिय होती. ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने गेल्यावर्षी नोव्हेंबर (२०२३) महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात होता. यामधील अप्पू – शशांकची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. मालिकेत शशांकची भूमिका अभिनेता चेतन वडनेरे साकारत होता. मालिका संपल्यापासून तो सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. नुकताच त्याचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. सध्या त्याने शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

१२ मे रोजी संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात मातृदिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या आईसाठी खास पोस्ट लिहिल्या आहेत. याशिवाय काही कलाकारांनी आपल्या आईला गोड सरप्राइज दिल्याचं पाहायला मिळालं. ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम चेतनने आपल्या आईला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आणि हटके शिकवलं आहे. त्याने आपल्या आईला चक्क दुचाकी चालवायला शिकवली आहे. याबद्दल एक व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने माहिती दिली आहे.

anant ambani and Radhika merchant dance at best friend sangeet ceremony video viral
Video: “अनारकली डिस्को चली…”, मुकेश अंबानींच्या धाकट्या सूनेचा मैत्रिणींसह जबरदस्त डान्स, तर अनंत अंबानी थिरकला ‘या’ गाण्यावर
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Auto Riksha Driver Viral Poster
Viral Photo : ‘एखाद्या मर्सिडीजसारखा…’ आजकालच्या तरुण मंडळींसाठी ‘त्याने’ रिक्षात लावले खास पोस्टर; वाचून नेटकरी म्हणाले, ‘खरे प्रेम… ‘
small boy stuck in lift
VIDEO : “तू आई नाही; मूर्ख बाई आहेस”, महिला मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यासाठी थांबताच चिमुकला लिफ्टमध्ये शिरला; पाहून काळजाचा ठोका चुकेल
Shocking video Young Man Risks His Life By Climbing 30-Ft Hoarding On Highway For Instagram Reel In UP's Saharanpur
“हे सगळं करताना एकदाही आई-वडील आठवत नाहीत?” तरुणानं रीलसाठी अक्षरश: कळस गाठला; VIDEO पाहून थरकाप उडेल
Girl fell down of scooty on road funny video goes viral on social media
बापरे! स्कूटी चालवणाऱ्या महिलेनं अक्षरश: एका मागोमाग ४ गाड्यांना दिली धडक; VIDEO पाहून कपाळावर माराल हात
Punekar man wrote funny message in back of the tempo video goes viral on social media puneri pati
VIDEO: “ती वेडी विचारते मला गर्लफ्रेंड आहे का तुला?…” पठ्ठ्यानं गाडीच्या मागे लिहिलं असं काही की पाहून रस्त्यानं सगळेच हसू लागले
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!

हेही वाचा : १७ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

चेतन वडनेरेची खास पोस्ट

“माझी आई आत्ता पन्नाशीनंतर गाडी चालवायला शिकली. अजून चार चाकी चालवणं बाकी आहे, सुरुवात मात्र दुचाकीने केली आहे. खरंतर जेव्हा गाडी शिकण्याचं वय होतं तेव्हा जवळ गाडी नव्हती आणि आता गाडी आहे तर शिकण्याचं वय गेलं असं तिला उगाच वाटत होतं. पण, शिकायला वयाची काही अट नसते. आपल्या आयांच्या अनेक आवडीनिवडी, नवीन काहीतरी शिकणं-फिरणं या गोष्टी त्या कायम पुढे ढकलत असतात, नंतर करू – नंतर करू असं म्हणत म्हणत त्या करायच्या राहून जातात. तुमच्या आईची एखादी इच्छा, आवड असेल तर त्यांना त्या जोपासायला सांगा. कसं आहे वेळ निघत नसतो तो काढावा लागतो. Happy mother’s day ( खरंतर हे Day’s पाळणं मला पटत नाही, मला उगाच ते फार औपचारिक वाटतं.) तरी हा व्हिडिओ टाकण्यासाठी या दिवसाचं औचित्य साधलं बास.”

हेही वाचा : थिएटर्स नाही तर थेट ओटीटीवर येतोय ‘हा’ मराठी सिनेमा; भुषण प्रधान, प्रार्थना बेहेरे अन् सयाजी शिंदेंच्या आहेत भूमिका

दरम्यान, अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर त्याचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. चेतन वडनेरे याने अभिनेत्री ऋजुता धारपशी लग्नगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नातील बरेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Story img Loader