‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘ठिपक्यांची रांगोळी’. गेल्या वर्षी ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. २०२१ रोजी एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. विशेष म्हणजे मालिकेतील अप्पू आणि शशांकची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली. त्यामुळे अजूनही दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.
काही दिवसांपूर्वी ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील शशांक म्हणजे अभिनेता चेतन वडनेरे लग्नबंधनात अडकला. २२ एप्रिलला चेतनने अभिनेत्री ऋजुता धारप हिच्याशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवलं. नाशिकमध्ये चेतन व ऋतुजाचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. आज अभिनेत्याने हळदी सोहळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
हेही वाचा – कुशल बद्रिकेला बायकोनं लावलं कामाला, फोटो शेअर करत म्हणाला, “एका भांडणात….”
२१ एप्रिलला चेतन व ऋजुताचा हळद लागली. हळदीसाठी अभिनेत्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला होता. तर ऋतुजाने पिवळा रंगाचा लेहंगा घातला होता, ज्यावर पांढऱ्या रंगाची ओढणी घेतली होती. हळदीतील खास क्षणाचा व्हिडीओ चेतनने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
हेही वाचा – नवरी मिळे हिटलरला: एजे-लीलाच्या मेहंदी सोहळ्यात सोनाली कुलकर्णीचा ‘या’ गाण्यावर खास परफॉर्मन्स, पाहा व्हिडीओ
दरम्यान, चेतन व ऋतुजाचा हा हळदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कलाकार मंडळींसह चाहते दोघांच्या हळदीच्या व्हिडीओ भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.