अभिनेत्री-लेखिका मुग्धा गोडबोले छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय आहेत. ‘आई कुठे काय करते’, ‘अजूनही बरसात आहे’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘श्रीमंत घरची सून’ अशा गाजलेल्या मालिकांसाठी त्यांनी लेखिका म्हणून काम पाहिलं आहे. उत्तम लिखाणाप्रमाणे त्या आपल्या दमदार अभिनयासाठी देखील ओळखल्या जातात. त्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका फेसबुक पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये अभिनेत्रीने नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसिद्ध अभिनेत्री-लेखिका मुग्धा गोडबोले यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित धन्वी प्रदूषणासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. तसेच वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अनुभवाविषयी देखील त्यांनी या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

हेही वाचा : Video : “पुणे तिथे काय उणे…”, माधुरी दीक्षितचा मराठी उखाणा ऐकून पती श्रीराम नेने म्हणाले…

अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांची पोस्ट

गेले कित्येक दिवस म्हणजे जवळपास 20-25 दिवस आमच्या घराजवळच्या दोन मैदानांवर रोज संध्याकाळी 7 वाजल्यापासून मेळा/जत्रा/ जाहीर कार्यक्रम सुरू आहेत. 10-10.30 ला संपतात. पण रोज संध्याकाळी 7 ते रात्री 10 जे असतं.. तेही त्रासदायकच असतं. माईकवरून भसाड्या आवाजात गाणारे, मोठ्याने लावलेले speakers, अगदी सुंदर मराठी गाणी सुद्धा रोज संध्याकाळी एवढ्या मोठ्या आवाजात का ऐकायची? आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी का हे महिना महिना सहन करायचं? आज कसलीतरी जत्रा, उद्या महोत्सव, परवा कुठलातरी प्रादेशिक बाजार, ह्यांचं संपतच नाही. ह्याबद्दल काही बोलायची सोय नाही कारण सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अंतर्गत हे सगळं मोडतं. ह्याच मैदानांवर असंख्य वेळा असंख्य विविध कारणांनी फटाके उडवले जातात. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय रे भाऊ अशी अवस्था आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत लोक बाहेर जातात तसं आता यंदा ह्या लादलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या हंगामात इथून बाहेर कुठेतरी जावं का ह्याचा विचार करावा लागणार. #हैराणजनता #zerosoundsensitivity

माझ्या पोस्टचा 22 जानेवारीशी काहीही संबंध नाही. मला कोणत्याही प्रकारच्या कर्कश्य ध्वनीचा त्रास होतो. मग तो कोणत्याही निमित्ताने आलेला असला तरी. मी आज हे लिहिलं कारण त्याचा माझ्या कामावर, एकाग्रतेवर आणि मानसिक स्वास्थ्यावर थेट परिणाम होतो आहे, गेले कित्येक दिवस. बाकी ज्यांना त्यातून जे अर्थ काढायचे आहेत त्यांनी ते खुशाल काढावेत. कीव करण्यापलीकडे मी काहीही करू शकत नाही.

हेही वाचा : लग्नानंतर आयरा खानची पहिली पोस्ट! वर्कआउट, कँडिड फोटो अन् राजस्थानी डान्स; मिथिला पालकरने वेधलं लक्ष

मुग्धा गोडबोले यांची पोस्ट

दरम्यान, मुग्धा गोडबोले यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये अभिनेत्रीचं समर्थन केलं आहे. तर, अन्य काही नेटकऱ्यांनी “तुम्हाला अधिक त्रास होत असल्यास कृपया याबद्दल पोलिसांकडे तक्रार करा” असा सल्ला अभिनेत्रीला दिला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thipkyanchi rangoli fame actress mugdha godbole shares angry post about noise pollution sva 00