कलाकार मंडळी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. फोटो, व्हिडीओ शेअर करून आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. आता तर अनेक कलाकार मंडळींचं स्वतःचं युट्यूब चॅनल देखील आहे. या चॅनलच्या माध्यमातून कलाकार आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. सध्या एका चिमुकल्या मुलीच्या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही चिमुकली आता मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पाहा तुम्हालाही ओळखते का कोण आहे ही अभिनेत्री?

या अभिनेत्रीने खडतर प्रवास करून मनोरंजन सृष्टीत पाऊल ठेवलं होतं. सुरुवातीला या अभिनेत्रीच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट होती. वीज बील भरायला सुद्धा घरात पैसे नव्हते. मेणबत्तीच्या प्रकाशावर या अभिनेत्रीने अभ्यास केला होता. दहावीत असताना या अभिनेत्रीच्या आईचे हर्नियाचे ऑपरेशन झाले. तेव्हा या अभिनेत्रीने जेवणाचे डबे द्यायला सुरुवात केली. दिवसाला ती ९० ते १०० चपात्या लाटायची. त्यानंतर बारावीत ही अभिनेत्री एका ट्रॅव्हल कंपनीत काम करू लागली. यादरम्यान तिने पार्लरचा कोर्स केला आणि या क्षेत्रात जसा तिचा जम बसला. तेव्हा तिने स्वतःचं सलून सुरू केलं. अभिनेत्रीच्या या कष्टामुळे घरची परिस्थिती सुधारू लागली. यावेळी एकाने या अभिनेत्रीला मालिकेसाठी ऑडिशन देण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे तिने ऑडिशन दिले आणि तिची निवडही झाली.

tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”
when shakti kapoor offered help to archana puran singh buy flat
शक्ती कपूर यांनी ‘या’ अभिनेत्रीला घर घेण्यासाठी देऊ केलेली मदत; खुलासा करत म्हणाली, “त्या काळी ५० हजार रुपये…”
Marathi Actress Rucha Vaidya Engagement
अडीच महिन्यांपूर्वी आदिनाथ कोठारेच्या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण करणाऱ्या मराठी अभिनेत्रीने उरकला साखरपुडा, फोटो आले समोर
Ratna Pathak Shah
संदूक: अभिनयाचा श्रीगणेशा
Manisha Kelkar Success Story
मराठी अभिनेत्रीची यशोगाथा! जागतिक पातळीवर करतेय देशाचं प्रतिनिधित्व, ‘कार रेसर’ म्हणून मिळवली ओळख, जाणून घ्या…

हेही वाचा – ‘जाऊ बाई गावात’च्या पहिल्या पर्वाच्या ट्रॉफीवर रमशा फारुकीने कोरलं नाव, उपविजेती ठरली अंकिता मेस्त्री

२०१८मध्ये ‘स्टार प्रवाह’च्या ‘छत्रीवाली’ या मालिकेसाठी तिची निवड झाली. अभिनयाची पाटी कोरली असली तरी अभिनेत्रीला या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ही प्रमुख भूमिका या अभिनेत्रीने उत्तमरित्या साकारली. त्यामुळे अल्पावधीतची ही अभिनेत्री नावारुपाला आली. त्यानंतर ती ‘मिसेस देशमुख’ या चित्रपटात ती झळकली. गेल्या वर्षी तिची लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता हिरवा टॉप, पांढरा स्कर्ट आणि त्यावर छोटीशी ओढणी घेतलेली फोटोमधली चिमुकली कोण असेल हे ओळख असेलच.

‘ठिपक्यांची रांगोळी’ मधील सुमी म्हणजे अभिनेत्री नम्रता प्रधान हिचा हा बालपणीचा फोटो आहे. नम्रताने हा बालपणीचा फोटो नुकताच इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. “नमा अँड बेबी नमा”, असं लिहित अभिनेत्रीने हा फोटो शेअर केला आहे; जो चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – लवकरच ‘स्टार प्रवाह’वर झळकणार दोन नवे सदस्य, ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याच्या नावाची चर्चा

दरम्यान, अलीकडेच नम्रता अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरसह केरळ ट्रीपला गेली होती. या केरळ ट्रीपचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. नम्रता व ज्ञानदा या दोघी खूप चांगल्या मैत्रीण आहेत.

Story img Loader