‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून अप्पूच्या रूपात अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर घराघरात पोहोचली आहे. ज्ञानदा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर अपलोड करुन ज्ञानदा चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतचं ज्ञानदाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहेत. या फोटोशूटमुळे ज्ञानदा चर्चेत आली आहे. या फोटोत तिने घालतलेल्या कपड्यावरुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. या ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना आता ज्ञानदाने सडेतोड उत्तर दिलं आहे.
हेही वाचा- मायरा वायकुळच्या नव्या मालिकेच्या सेटवर घुसला बिबट्या, कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण
या फोटोमध्ये टी-शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट परिधान केली होती. जस्ट चिलीन, असं कॅप्शन देत ज्ञानदाने फोटो शेअर केलेत. या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. काहींनी कसाटा आईस्क्रीम’ आहे असं म्हटले आहे. तर काहींनी तिने घातलेल्या कपड्यावरुन तिला ट्रोल केलं आहे.
या फोटोवर एका ट्रोलरनं, “कापड कमी पडलं वाटतं”, अशी कमेंट केली होती. ही कमेंट वाचल्यानंतर मात्र इतके दिवस शांत असलेल्या ज्ञानदानं ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे. ट्रोलरच्या कमेंटवर, “कपडे नाही तुमच्या विचारांची पोच कमी पडली”, असं म्हणतं सडेतोड उत्तर दिलं आहे.