एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली ‘ठिपक्यांची रांगोळी’ या लोकप्रिय मालिकेने गेल्यावर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला. १८ नोव्हेंबर २०२३ रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. जरी मालिका बंद झाली असली तरी मालिकेतील कलाकार नेहमी चर्चेत असतात. आता या मालिकेतील एक अभिनेत्री अजिंक्य राऊतच्या ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत झळकणार आहे. याचा प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ठिपक्यांची रांगोळी’मधील अभिनेत्री सई कल्याणकर ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत सई एका वेगळ्याच आणि हटके अंदाजात पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या आजच्या महाएपिसोडमध्ये सईची धमाकेदार एन्ट्री होणार आहे. याचा प्रोमो सध्या व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – मराठी रसिक प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी; लवकरच ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाचा येणार दुसरा भाग, ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्याने केला खुलासा

‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेच्या महाएपिसोड प्रोमोमध्ये, बाईकवरून सईची (जोजो) दागिण्यांच्या दुकानात धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळत आहे. यावेळी सई राजवीरला बंदूक दाखवून घाबरवते. पण तितक्यात मयूरी येते सईचा चेहरा उघड करते. सईच्या रुपात जोजो नावाचं हे मयूरी व राजवीरच्या नात्यातलं तुफान आहे. त्यामुळे हे तुफान काय धुमाकूळ घालतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा – निर्मिती क्षेत्रात डंका वाजवणारी ‘ही’ लोकप्रिय मराठी अभिनेत्री लवकरच झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये, पोस्ट करत म्हणाली…

दरम्यान, मालिकेच्या या दमदार प्रोमोवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “दोघात तिसरा…पण प्रेम अजून वाढणार आणि मज्जा येणार”, “आता मयूरीचा जळफळाट होणार”, “व्वा…नवीन ट्विस्ट, मज्जा येईल”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thipkyanchi rangoli fame sai kalyankar entry in abol pritichi ajab kahani marathi serial pps