‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी आपल्या अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मालिकेत सुप्रिया यांनी माधवी विनायक कानिटकर उर्फ माईची भूमिका साकारली असून या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. अशातच आता लवकरच सुप्रिया पाठारे चाहत्यांच्या भेटीला नवीन काहीतरी घेऊन येणार असल्याचं त्यांनी सोशल मीडियाद्वारे जाहीर केलं आहे.
अभिनेत्री सुप्रिया पाठारे या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सतत व्हिडीओ आणि फोटो शेअर करून त्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. दरम्यान, सुप्रिया यांचा मुलगा मिहिर पाठारे हा प्रोफशनने शेफ आहे, हे बऱ्याच जणांना माहित आहे. परदेशात लोकप्रिय असलेली फूट ट्रकची संकल्पना त्याने ठाण्यात सुरू केली आहे. ‘मharaj’ असं त्या फूट ट्रकच नाव आहे. या ट्रकवर वेगवेगळ्या प्रकारची पावभाजी तसेच इतर पदार्थही मिळतात. या व्यवसायासाठी सुप्रिया पाठारे त्यांच्या मुलाच्या पाठिमागे नेहमी खंबीर उभ्या असतात. आता या फूट ट्रकनंतर लवकरच ‘मharaj’ पावभाजी आणि फास्ट फूट कॉर्नर सुरू करणार आहेत.
हेही वाचा – Sahkutumb Sahparivar: “…तर आम्ही सगळे त्याला पोकळ बांबूचे फटके देणार”; असं अवनी वैभवला का म्हणाली?
सुप्रिया पाठारे यांनी या कॉर्नरचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या ‘मharaj’ पावभाजी आणि फास्ट फूट कॉर्नरची पूजा करताना दिसत आहेत. अभिनेत्रीनं हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, “महाराज पावभाजी आणि फास्ट फूड…लवकरच तुम्हा सगळ्यांच्या भेटीला”
हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबबरोबर अफेअरच्या चर्चा, निमिषने सोडलं मौन; म्हणाला, “आम्ही…”
या व्हिडीओवर इतर कलाकारांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून सुप्रिया यांना शुभेच्छा दिल्या आहे. अभिनेत्री पल्लवी वैद्य हिनं लिहिलं आहे की, “कमाल, चला आता इथेच भेटूया लवकर.” तर विदिशा म्हसकर हिनं लिहिलं आहे की, “तुझ्यासारखी माऊली पाठिशी असताना भिती कशाची.” याशिवाय कुशल बद्रिके, रूपल नंद, अश्विनी कासर यांनी सुप्रिया यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा – ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत ‘या’ भूमिकेत दिसणार किरण माने; म्हणाले, “खूप वर्षांनी…”
सुप्रिया पाठारे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेपूर्वी त्या ‘मोलकरीण’, ‘जागो मोहन प्यारे’ यांसारख्या लोकप्रिय मालिकेत दिसल्या होत्या. तसेच त्यांनी ‘बाळकडू’ अशा विविध चित्रपटातही काम केलं आहे. शिवाय त्यांच्या नाटकामधील भूमिकेनेही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.