‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली ही मालिका गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पण आता मालिका शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आली. आज मालिकेतील अप्पू म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिचा शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Bigg Boss 17: अंकिता लोखंडे सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत झाली भावुक; म्हणाली, “तो खूप…”

ऑक्टोबर २०२१ साली सुरू झालेली ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या ही पात्र आता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहेत. मालिकेतील नवनवीन ट्वीस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. त्यामुळे ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका टीआरपीच्या यादीतही पहिल्या दहामध्ये आहे. पण आता मालिका लवकरच ऑफ एअर होणार आहे. आज मालिकेतील अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिचा शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. यासंदर्भात तिने एक भावुक पोस्ट करून व्हिडीओ शेअर केले आहेत.

हेही वाचा – मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत ऐश्वर्या राय-बच्चन व सलमान खानने एकमेकांना मारली मिठी? फोटो आला समोर

काल ज्ञानदाने इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक फोटो शेअर करत त्यावर लिहीलं की, “हाय अप्पू…आजच्या रात्रीची झोप खूप त्रासदायक असेल…कारण उद्या शेवटचा दिवस आहे, याची मी कल्पना करू शकत नाही…कानिटकर वाडा…आपण दोघेही आपल्या आवडत्या ठिकाणी भेटणार आहोत…पण उद्याचा दिवस आपण साजरा करूया.. लवकरच भेटू…प्रेम” या स्टोरीनंतर ज्ञानदाने आज सुमी म्हणजेच अभिनेत्री नम्रता प्रधानबरोबर मेकअप रुममधला व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ज्ञानदा म्हणतेय की, “शुभ प्रभात…आज आपला शेवटचा दिवस.” त्यानंतर अभिनेत्रीने आणखी एक स्टोरी टाकून लिहीलं, “चला आजचा शेवटचा दिवस अविस्मरणीय करू…”

हेही वाचा – “जगबुडी होईल पण ही मालिका…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “भिकेचे डोहाळे…”

दरम्यान, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो आल्यापासून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ऑफ एअर होणार अशी चर्चा सुरू झाली होती. पण ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका बंद होणार नसून रात्री १० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं निश्चित झालं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thipkyanchi rangoli marathi serial will off air actress dnyanada ramtirthkar share emotional post pps