अभिनेता आमिर अली अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. आमिरने अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केलंय. नुकत्याच एका जाहिरातीदरम्यान आमिरची विराट कोहलीशी भेट झाली. आता या अभिनेत्याने त्यांच्यात झालेल्या संवादाबद्दल आणि एका भेटीतच किंग कोहलीने कशाप्रकारे त्याला प्रभावित केलं याबद्दल विस्तृतपणे सांगितलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आमिर अलीने नुकतीच गलाटा इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान आमिर म्हणाला की, “मी आणि विराट एका जाहिरातीच्या शूटसाठी अलीकडेच भेटलो होतो. मी त्याचा आणि महेंद्रसिंग धोनीचा खूप मोठा चाहता आहे. मी विराटकडे ऑटोग्राफ मागणार होतो, पण ते चांगलं दिसणार नाही म्हणून फक्त एक फोटो घेतला. पण, नंतर एका बॅटवर ऑटोग्राफ देऊन ती बॅट त्याने माझ्यासाठी पाठवली, तो खरंच खूप चांगला माणूस आहे, माझा त्याच्याशी खूप छान संवाद झाला.”
आमिरने हेदेखील सांगितलं की, दोघांनी फिटनेस आणि क्रिकेटबद्दल गप्पा मारल्या. कुटुंबाबद्दल बोलताना विराटच्या डोळ्यात आनंद दिसला आणि ती विराटची गोष्ट आमिरला खूप आवडली. आमिर म्हणाला, “विराट आणि माझा वेळ गप्पा मारण्यात गेला. मला त्याच्याबद्दल काय आवडतं हे मी त्याला सांगितलं. कुटुंबाबद्दल बोलताना त्याच्या डोळ्यात एक वेगळाच आनंद मला दिसला आणि ते मला खूप आवडलं.”
आमिर अलीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं, तर आमिरने ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्री संजीदा शेखसह २०१२ मध्ये लग्न केलं होतं, पण नऊ वर्ष संसार केल्यानंतर २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. आमिर आणि संजिदाला आयरा अली नावाची लेक आहे.
हेही वाचा… “माझ्या अंगावरचे डाग…”, कर्करोगाशी सामना करणाऱ्या हिना खानचा चाहत्यांना प्रश्न, म्हणाली…
दरम्यान, आमिर अलीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, आमिर शेवटचा ‘लूटेरे’ या टीव्ही सीरिजमध्ये झळकला होता. जय मेहता प्रदर्शित ही सीरिज डिझ्नी+हॉटस्टारवर २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झाली होती. आमिरने अनेक चित्रपट, मालिकांसह अनेक रिअॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालनही केलं आहे.