‘बालवीर’, ‘झाँसी की रानी’ अशा मालिकांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अनुष्का सेन सध्या चर्चेत आहे. वयाच्या अगदी सातव्या वर्षी अनुष्काने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. २०१२ मध्ये ‘बालवीर’ या मालिकेत तिच्या मेहेर या भूमिकेला प्रचंड प्रेम मिळालं आणि ती प्रसिद्धीझोतात आली. अभिनेत्री मालिकांसह अनेक चित्रपट, वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडीओमध्येदेखील झळकली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुष्काने नुकतीच ‘फिल्मीग्यान’च्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने खुलासा केला की, तिने आजपर्यंत कोणालाच डेट केलेलं नाही. मुलाखतीत अनुष्का म्हणाली, “मी सिंगलच आहे, मी कधीच कोणाला डेट केलं नाही. यावर मुलाखतदाराने हे मिथक असल्याचं म्हटलं. यावर अनुष्का म्हणाली, “खरंच असं काही नाहीय, मला कळत नाही की कोणी माझ्यावर विश्वास का ठेवत नाही, मी शप्पथ घेऊन सांगते.”

हेही वाचा… “मी माझा राग…”, संकर्षण कऱ्हाडेने सांगितला बाबा होण्याचा ‘तो’ अनुभव, म्हणाला…

अनुष्का पुढे म्हणाली, “१४ वर्षे इंडस्ट्रीत राहून मी कधीच प्रेमात पडले नाही आणि तेव्हा मी लहान होते ना? लहान असताना मी कसं काय डेट करेन? आणि जेव्हा मला कळायला लागलं, तेव्हापासून आजपर्यंत मी त्या योग्य व्यक्तीच्या शोधात आहे आणि आजच्या काळात हे जे ‘सिच्यूएशनशिप’ आहे त्यावर माझा विश्वास नाही.”

हेही वाचा… वडिलांनी कायमचं मारून टाकण्याच्या आधीच आईने दिला पळून जाण्याचा सल्ला, ‘या’ अभिनेत्याने सांगितला आयुष्यातला तो कठीण प्रसंग

“असं नाहीय की मला कधीच कोणी आवडलं नाही. तसं नक्कीच झालंय. जेव्हा केव्हा असं झालंय, तेव्हा माझं मला कळायला लागत की, हे जे नातं आहे ते पुढपर्यंत टिकणार नाही किंवा हे माझ्यासाठी नाही बनलंय आणि हे जे मिथक आहे की तुम्ही इंडस्ट्रीमधलं कोणावर प्रेम करू नये, तर ते मला पटत नाही. प्रेम हे प्रेम असतं आणि कलाकारदेखील खूप चांगली माणसं असतात”, असंही अनुष्का म्हणाली.

हेही वाचा… VIDEO: ‘हीरामंडी’मधील शर्मिन सेगलच्या अभिनयाची जन्नत झुबेर, निया शर्मा, रीम शेख यांनी केली नक्कल, नेटकरी म्हणाले, “अभिनेत्रीची खिल्ली…”

दरम्यान, अनुष्काच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अनुष्का शेवटची ‘दिल दोस्ती डिलेमा’ या टेलिव्हिजन सीरिजमध्ये झळकली होती. ही टेलिव्हिजन सिरिज अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर २४ एप्रिल २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आली. अनुष्का ‘आशिया’ नावाच्या तिच्या पहिल्या कोरियन चित्रपटासाठीदेखील शूटिंग करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This actress never dated after being in the industry for 14 years dvr