टेलिव्हिजनविश्वात सध्या ‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम चांगलाच गाजतोय. यातील बरेच नट सोडून गेले, मध्यंतरी या कार्यक्रमाबद्दल बऱ्याच चुकीच्या गोष्टीसुद्धा बाहेर आल्या पण तरी या शोची लोकप्रियता दिवसागणिक वाढतच आहे. अभिनेत्री अर्चना पूरण सिंग या ह्या कार्यक्रमात परीक्षक म्हणून भूमिका बजावतात, त्यांच्या आधी ही जबाबदारी नवजोत सिंग सिद्धू यांच्याकडे होती. अर्चना पूरण सिंग या त्यांच्या खास हसण्याच्या स्टाइलमुळे कायम चर्चेत असतात.

आता मात्र अर्चना पूरण सिंग यांची परीक्षकाची खुर्ची धोक्यात आली असल्याचं समोर आलं आहे. याबद्दल बऱ्याचदा कपिल अर्चना यांची खिल्ली उडवत असतो. कार्यक्रमाच्या सेटवर यांच्यात प्रचंड धमाल मस्ती सुरू असते. या मंचावर मोठमोठे सेलिब्रिटी आणि बॉलिवूड कलाकार येऊन त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशनही करतात. अशीच एक बॉलिवूड अभिनेत्री अर्चना यांची जागा बळकावू शकते हे खुद्द अर्चना यांनीच सांगितलं आहे.

आणखी वाचा : बॉलिवूडची ‘दामिनी’ पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर; अभिनेत्रीने व्यक्त केली पुनरागमनाची इच्छा

नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री काजोलने ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात हजेरी लावली. काजोल या मंचावर तिच्या आगामी ‘सलाम वेंकी’ या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आली होती. काजोल आणि चित्रपटातील कलाकारांबरोबर कपिल आणि त्याच्या टीमने धमाल गप्पा मारल्या. कपिल आणि इतर कलाकारांच्या विनोदावर काजोल भरपूर हसली आणि तिच्या हसण्याची तुलना अर्चना पूरण सिंग यांच्या हसण्याशी केली गेली.

काजोलला एवढं मनमुराद हसताना पाहून अर्चना पूरण सिंग या स्वतःहून म्हणाल्या की, “या कार्यक्रमात माझ्या खुर्चीवर फक्त काजोलच बसू शकते. तीच या खुर्चीसाठी पात्र आहे.” अर्थात या सगळ्या गोष्टी मस्करीतच सुरू होत्या. सिद्धू नव्हे तर काजोलच त्यांची जागा घेऊ शकते असं अर्चना यांनी सांगितल्यावर सगळ्यांनाच ती गोष्ट पटली. काजोलचा ‘सलाम वेंकी’ हा चित्रपट ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader