‘कन्यादान’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकांतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अमृता बने गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एप्रिल महिन्यात अमृताने शुभंकर एकबोटेशी लग्नगाठ बांधली आणि ‘कन्यादान’ मालिकेतील हे ऑनस्क्रिन कपल सात जन्माचे साथी झाले.

अमृता बने सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनयाव्यक्तिरिक्त वैयक्तिक आयुष्यातले क्षणदेखील सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

anil kapoor
अभिनेत्रीचा ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपटातील अनिल कपूर यांच्याबरोबरच्या किसिंग सीनबाबत खुलासा; म्हणाली, “मला रडावे…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Lavani is more popular in folk art says Tara Bhavalkar
लावणी लोककलेत अधिक लोकप्रिय – तारा भवाळकर
Ishika Taneja takes diksha left showbiz mahakumbh 2025
प्रसिद्ध अभिनेत्रीने कुंभमेळ्यात घेतली दीक्षा, ३० व्या वर्षी ग्लॅमरविश्व सोडले; म्हणाली, “स्त्रिया लहान कपडे घालून नाचायला…”
Ranbir Kapoor and Alia Bhatt daughter raha clicks Shaheen Bhatt photo
रणबीर कपूर-आलिया भट्टची दोन वर्षांची लेक झाली फोटोग्राफर! राहाने आई-बाबांचा नाही तर ‘या’ खास व्यक्तीचा काढला सुंदर फोटो
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
paaru fame sharayu sonawane get ukhana for husband Jayant lade
“संसार असतो दोघांचा…”, ‘पारू’ फेम अभिनेत्री शरयू सोनावणेने घेतला हटके उखाणा, म्हणाली…
paaru fame sharayu sonawane so excited for Divya Pugaonkar
‘पारू’ फेम शरयू सोनावणे ‘या’ अभिनेत्रीच्या लग्नासाठी आहे खूप उत्सुक, म्हणाली…

हेही वाचा… ठरलं तर मग: प्रियाला जीवे मारण्याचा प्रयत्न अन्…, सायली- अर्जुनचं सत्य सुभेदार कुटुंबासमोर येईल का? पाहा प्रोमो

आता ‘कन्यादान’फेम अभिनेत्री वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अमृताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. अमृताने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिच्या पायावर गेटवे ऑफ इंडियाचा टॅटू काढलेला दिसत आहे, तर दुसर्‍या फोटोत ती गेटवे ऑफ इंडियाच्या बाहेर उभी राहिलेली दिसतेय. “मेरी जान” असं कॅप्शन अमृताने या फोटोंना दिलं आहे. अमृताचा हा टॅटू तेजस्वी प्रभुळकर हिने काढला आहे.

अमृताने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्रीने काळ्या आणि सफेद रंगाचं शॉर्ट जंपसूट घातलं आहे. अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहिलं, “मुंबईची पोरगी, बेस्ट पोरगी”; तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “खूप छान.” या फोटोला अभिनेत्रीने “मुंबई मेरी जान” हे गाणं जोडलं आहे.

हेही वाचा… लग्नानंतर पहिल्यांदाच सोनाक्षी सिन्हा पती झहीर इक्बालबरोबर गेली डिनर डेटला; मेहेंदीवरून नेटकऱ्यांनी केली शंका व्यक्त, म्हणाले…

दरम्यान, अमृताच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर तिची आणि शुभंकरची पहिली भेट ही ‘कन्यादान’ या मालिकेच्या सेटवरच झाली होती. अमृता आणि शुभंकरने नोव्हेंबर महिन्यात साखरपुडा उरकत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. एप्रिल महिन्यात शाही विवाहसोहळा पार पाडत दोघं लग्नबंधनात अडकले.

हेही वाचा… …अन् जुई गडकरीवर आली पिस्तूल बाळगण्याची वेळ; अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “मला जीवे मारण्याची…”

साखरपुडा, व्याही भोजन, मेहंदी, हळद आणि लग्न या सगळ्याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले होते आणि ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तर हनिमूनसाठी हे कपल व्हिएतनामला गेलं होतं. लग्नसोहळ्यातील फोटोंप्रमाणेच दोघांचे हनिमूनचे फोटोदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

Story img Loader