‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लवकरच मालिकेचा गोड शेवट पाहायला मिळणार आहे. गेल्या ४ वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिकेतील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. आता मालिका शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ‘जलसा’वर; अमिताभ बच्चन यांना बांधली राखी, म्हणाल्या, “भारतातील…”

२०१९ला सुरू झालेल्या ‘रंग माझा वेगळा’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांना नवनवीन ट्विस्टमुळे चांगलंच खिळवून ठेवलं होतं. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका अव्वल स्थानावर होती. पण अलीकडे मालिकेत झालेल्या नव्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली होती. तरीही मालिकेने १००० भागाचा टप्पा पार करून आता शेवटाकडे येऊन पोहोचली आहे. त्याचनिमित्तानं मालिकेतील लोकप्रिय पात्र दीपा म्हणजे अभिनेत्री रेश्मा शिंदेने ‘मज्जा’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी संवाद साधला. त्यावेळी तिला विचारलं गेलं की, ‘तुझ्यासाठी संपूर्ण मालिकेतील सर्वात चॅलेजिंग आणि जवळचा असा कोणता सीन होता?’

हेही वाचा – बिग बॉस विजेती मेघा धाडेची भाजपाच्या ‘या’ पदी नियुक्ती; म्हणाली, “मला…”

हेही वाचा – कुणी म्हणाले वेडे, तर कुणी म्हणाले प्रेरणादायी; अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांच्या नव्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

यावर रेश्मा शिंदे म्हणाली की, “माझ्यासाठी शेवटचा सीन खूप हा लक्षात राहील. कारण त्याच्या आदल्या रात्री मला झोप येतच नव्हती. मी चार वाजता झोपले. असं नाही की मी विचारत करत बसले वगैरे. मी आईला म्हटलं, माझा शेवटचा कॉल टाइम आला आहे. ते वाचल्यावर मला खूप धक्का बसला. आता इथू पुढे कॉल टाइम येणार नाही. त्यामुळे शेवटचा सीन माझ्या कायम जवळचा राहील.”

हेही वाचा – “किती काळ काठावर उभं राहून…” बिग बॉस फेम अभिनेत्यानं भाजपमध्ये केला जाहीर प्रवेश; म्हणाला…

दरम्यान, ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या जागी तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ४ ऑगस्टपासून ही मालिका संध्याकाळी ८ वाजता पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This sean challenging for rang maza vegla fame reshma shinde pps