‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकमान्य ही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘दशमी क्रिएशन्स’ निर्मित ‘लोकमान्य’ मालिकेतून लोकमान्य टिळकांची ऐतिहासिक चरित्रगाथा मांडण्यात येत आहे. पण, टीआरपीच्या कारणास्तव ही मालिका वेळेआधीच संपवण्यात येणार आहे. दरम्यान, या मालिकेच्या सेटवर ‘शोले’ चित्रपटातील एका शॉटचे चित्रीकरण झाले होते. याबाबतचा खुलासा लोकमान्य टिळकांची भूमिका साकारणार अभिनेता क्षितीश दाते याने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडेच ‘अल्टा मराठी बझ’ या एंटरटेन्मेंट यूट्यूब चॅनेलवरून क्षितीश दातेने ‘लोकमान्य’ मालिकेचा संपूर्ण सेट दाखवला. या व्हिडीओत या अभिनेत्याने मालिकेतील विविध सीन कशा प्रकारे आणि कुठे कुठे शूट होतात हे दाखवले. तसेच यावेळी क्षितीशने ‘शोले’ चित्रपटातील जया बच्चन यांचा एक शॉट येथे चित्रित झाल्याचा खुलासा केला.

हेही वाचा – जेव्हा अभिनेता सिद्धार्थ जाधवला भेटतात बेवडे फॅन; स्वतः किस्सा सांगत म्हणाला, “उत्साहाच्या भरात…”

क्षितीश म्हणाला, “हा सेट खूप जुना आहे. साधारण १०० वर्षं ही जुनी जमीन आहे. हा स्टुडिओ १९४० सालापासून इथे असेल. एक गंमत सांगतो, इथे ‘शोले’ चित्रपटातील एका सीनचं चित्रीकरण झालं होतं. जया बच्चन कंदील लावतानाचा जो शॉट आहे, तो इथे शूट झाला आहे. इतका हा जुना स्टुडिओ आहे.”

हेही वाचा – Bigg Boss OTT 2: ‘वेड’ फेम जिया शंकरने खासगी आयुष्याबद्दल केला खुलासा, म्हणाली, “एकट्या आईबरोबर…”

हेही वाचा – Video: “हा शेवट कसा असू शकतो?” ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेचा शेवट बघून नेटकऱ्यांचा प्रश्न; म्हणाले, “आम्हाला पशा-अंजीचं…”

दरम्यान, ‘झी मराठी’वरील ‘लोकमान्य’ मालिकेबरोबर ‘३६ गुणी जोडी’ ही मालिकाही बंद होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक सध्या नाराज आहेत. या दोन्ही मालिकांच्या जागी नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This shot in sholay movie had shooting on the sets of lokmanya serial pps