अलीकडेच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू झालेल्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता समीर परांजपे ही नवी जोडी प्रेक्षकांच्या अल्पावधीत पसंतीस पडली आहे. मालिकेतील इतर कलाकारांनी देखील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशातच समीर परांजपे व त्याची चिमुकली लेक साचीचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

काही महिन्यांपूर्वी समीर परांजपेचा साचीबरोबर शाळेतल्या कार्यक्रमात डान्स करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता दोघांचा आणखी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. समीर परांजपेने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “काही दिवस आजी येऊन गेली की होणार परिणाम…शास्त्र असतं ते…”, असं कॅप्शन लिहित समीरने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: एजे-लीलाच्या रिसेप्शन सोहळ्यात होणार धमाल, अधिपती-अक्षरासह ‘हे’ खास पाहुणे करणार डान्स

या व्हायरल व्हिडीओमध्ये समीरची चिमुकली लेक त्याची दृष्ट काढताना दिसत आहे. तिच्या आजीचं पाहून ती देखील आपल्या लाडक्या बाबाची दृष्ट काढते आणि म्हणते आता पाण्यात टाकायला जाते. यावेळी समीर लेकीची ही कृती पाहून हसताना दिसत आहे. समीर व त्याच्या लेकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल आहे.

या व्हिडीओवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “गोंडस”, “भारीच गोड झालंय पिल्लू”, “खूप गोड आहे पिल्लू…आणि बरोबर आहे…लहान मुलांनी असेच आपले संस्कार आणि शास्त्र पुढे नेले पाहिजेत”, “किती गोड”, अशा अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया समीर व त्याच्या लेकीच्या व्हिडीओवर उमटल्या आहेत.

हेही वाचा – ‘कोंबडी पळाली’च्या चित्रीकरणादरम्यान झालेला घोळ, प्रसिद्ध अभिनेत्याने केलं होतं सहाय्यक दिग्दर्शकाचं काम; वाचा ‘जत्रा’विषयी न माहिती असलेल्या गोष्टी

दरम्यान, समीर परांजपेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘स्टार प्रवाह’च्याच ‘गोठ’ मालिकेतून तो घराघरात पोहोचला. त्यानंतर समीर ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याने साकारलेली अभिमन्यू उर्फ अभ्याची भूमिका चांगलीच गाजली. मग या मालिकेनंतर समीर ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरूणाईचा’ या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाला. अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या समीरच्या आवाजाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. पण या स्पर्धेत समीर अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही.