‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘राधा ही बावरी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रुती मराठे तिच्या सौंदर्याबरोबरच अभिनयामुळेही कायम चर्चेत असते. श्रुतीनं मालिका, चित्रपट, वेब सीरिज या तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनय कौशल्याने एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिनं मराठीबरोबर, तमिळ, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये काम केलं आहे. शिवाय तिनं निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. ‘झी मराठी’वरील ‘नवा गडी नवं राज्य’ या लोकप्रिय मालिकेची ती निर्माती आहे. अशा सर्वगुण संपन्न असलेल्या अभिनेत्रीनं कोणत्या तीन निकषांवर काम स्वीकारते याचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Video: ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील दोन अवनींची हार्दिकबरोबरची मज्जा-मस्ती, पडद्यामागचा व्हिडीओ व्हायरल

अलीकडेच तिनं ‘क्लिको व्लॉग’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिला विचारलं गेलं की, ‘एखाद काम आलं तर ते करायचं की नाही हे ठरवण्यासाठी त्यामध्ये तू काय पाहतेस.’ यावर श्रुती मराठे म्हणाली की, “मी नेहमी कोणतंही काम तीन निकषांवर स्वीकारते. या तिन्ही निकषांपैकी एकच निकष असेल तरीही मी ते काम स्वीकारते. पहिला निकष म्हणजे भूमिका चांगली पाहिजे. एक कलाकार म्हणून जर आव्हानात्मक भूमिका असेल तरीही मी ते काम स्वीकारते. दुसरा निकष म्हणजे भूमिका फक्त ठीक आहे, पण दिग्दर्शक तगडा आहे. तर मी ते काम स्वीकारते. मग भूमिका छोटी असो किंवा मोठी असो, याचा काही फरक नाही पडत. ते काम मी करते. आता तिसरा निकष म्हणजे दिग्दर्शक पण चांगला आहे आणि भूमिकापण चांगली आहे, तर पैसे देखील चांगले मिळाले पाहिजे. तर मी काम स्वीकारेन. या तीन निकषांचा विचार करून मी कुठंलही काम स्वीकारते.”

हेही वाचा – Video: राष्ट्रगीताला चुकीच्या पद्धतीनं उभी राहिल्यामुळे करीना कपूर ट्रोल; नेटकरी म्हणाले, “लज्जास्पद…”

हेही वाचा – “माझी कंबर…” साडी नेसण्याच्या पद्धतीवरून ट्रोल करणाऱ्यांना मराठमोळ्या अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “स्त्रीने काहीही परिधान केलं तरी…”

दरम्यान, श्रुती मराठेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं ‘राधा ही बावरी’ या व्यतिरिक्त ‘जागो मोहन प्यारे’ या लोकप्रिय मालिकेतही काम केलं आहे. तसेच ‘सनई चौघडे’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘शुभ लग्न सावधान’ यांसारख्या चित्रपटातही तिनं काम केलं आहे. शिवाय श्रुती इमरान हाशमीच्या ‘बार्ड ऑफ ब्लड’ सीरिजमध्येही झळकली होती.