बिग बॉसचा १६ वा सीझन सध्या बराच गाजतोय. टीना दत्ता, शालीन भानोत आणि सुंबूल तौकीर खान हे प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे. शुक्रवारी ‘विकेंड का वार’मध्ये बिग बॉस मेकर्सनी तिघांच्याही पालकांना बिग बॉसच्या सेटवर बोलावलं आहे. यावेळी तिघांच्याही पालकांमध्ये जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळालं. पण या मिटिंगच्या आधी टीना दत्ताच्या आईने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवरून आता टीना दत्ताच्या आईला ट्रोल केलं जात आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवरून टीनाच्या आईला चांगलंच सुनावलं आहे.
बिग बॉसमध्ये सुंबूल आणि तिच्या वडिलांचं एकमेकांशी फोनकॉलवर बोलणं करून देण्यात आलं होतं. सुंबूलच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने ते आयसीयूमध्ये असल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं होतं आणि त्यांची मुलीशी बोलण्याची इच्छा आहे असंही म्हटलं होतं. त्यांची तब्येतीचा मुद्दा लक्षात घेत बिग बॉस मेकर्सनी सुंबूल आणि तिच्या वडिलांचं बोलणं करून दिलं. पण नंतर त्यांनी तब्येतीचं कारण देत मुलीशी बोलून गेम प्लान आणि नॉमिनेशनवर बोलल्याचं समोर आलं. जेव्हा हे सर्व बिग बॉसच्या सदस्यांना समजलं तेव्हा घरातील वातावरणच बदललं. शालीन आणि टीना तर सुंबूलवर प्रचंड चिडलेले पाहायला मिळाले. त्यानंतर मेकर्सनी तिघांच्याही पालकांना मंचावर बोलावलं.
आणखी वाचा- “स्वतःची मुलगी सांभाळता येत नाही…” सुंबुलच्या वडिलांवर टीना दत्ता भडकली
आज ‘शुक्रवार का वार’मध्ये सलमान खानसमोर शालीनचे पालक, टीनाचे आई-बाबा आणि सुंबूलचे वडील मुलांचे निर्णय आणि गेम प्लानवर बोलताना दिसणार आहेत. पण याआधी टीनाच्या आईने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात त्या नर्व्हस असल्याचं दिसून येत आहे. शो आणि आपल्या मुलीबद्दल बोलताना दिसत आहेत. पण त्यांच्या या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी त्यांनाच सुनावलं आहे.
टीना दत्ताची आई या व्हिडीओमध्ये म्हणते, “मला बिग बॉसच्या शोमध्ये बोलवण्यात आलं आहे. मी खूप नर्व्हस आहे. माझ्या मुलीला नॅशनल टेलिव्हिजनवर शिव्या घातल्या जात आहेत. तिच्याबद्दल बरंच काही बोललं जातंय. माझं हृदय खूप धडधडतंय. तिथे मी काय बोलणार आहे हे मला माहीत नाही. तिथे सगळं कसं होणार हेही माहीत नाही.”
टीनाच्या आईच्या या व्हिडीओवर सुंबूलच्या चाहत्यांनी मात्र त्यांना बरंच ट्रोल केलं आहे. तुम्ही आधी तुमच्या मुलीला समजवा, दिवसभर बसून ती सुंबूलबाबत बोलत राहते. प्रत्येकवेळी ती सुंबूलच्या टॉपिकमध्ये बोलत राहते. अशा प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलं, “तुमची मुलगी अतिशय बेशिस्त आहे. अत्यंत वाईट प्रकारचा गेम खेळत आहे आणि तुम्ही तिला समजवायला हवं.”