मराठी सिनेसृष्टीतील कलाकार कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. मराठी चित्रपटसृष्टीसह मालिका विश्वातील कलाकारांचेही लाखो चाहते आहेत. सध्या ‘आई कुठे काय करते’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ यांसह अनेक मालिकांनी चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत सारिका आत्याची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने नुकतंच सिनेसृष्टीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत सारिका आत्या हे पात्र अभिनेत्री राधिका विद्यासागर साकारत आहे. या मालिकेतील तिच्या पात्राचे कौतुक घराघरात केले जाते. यात ती सकारात्मक भूमिका साकारत असल्याने ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. नुकतंच या राधिका विद्यासागर यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सिनेसृष्टीत आलेल्या काही कटू अनुभवाबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “एमसी स्टॅनने माझी माफी मागितली कारण…” शिव ठाकरेचा खुलासा

“प्रत्येक क्षेत्रात चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव येत असतात. या क्षेत्रात तुम्हाला खात्रीने काम मिळतं. मला माझ्या नशिबाने चांगल्या भूमिका, चांगली लोकं मिळाली. काही किरकोळ असे वाईट अनुभव आले, पण त्यातू मी नेहमी पुढे शिकत राहिले”, असे त्या म्हणाल्या.

“पण सिनेसृष्टीचं एक कटू सत्य आहे ते म्हणजे या क्षेत्रात पैसे कधीच वेळेत मिळत नाही. लोकांना महिन्याच्या शेवटी पगार मिळायची सवय असते. पण सिनेसृष्टीत तसं होत नाही. तीन चार महिन्यांनी तुम्हाला तुमचे पैसे मिळतात. ही या क्षेत्रातील सर्वात वाईट गोष्ट आहे. हे कसं बदलेल याबद्दल मला माहिती नाही. पण हे सत्य आहे”, असा खुलासाही त्यांनी केला.

आणखी वाचा : “मराठी अभिनेत्रींना कमी मानधन…” तेजस्विनी पंडितचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

“आम्ही अनेकदा १५ ते १६ तास काम करतो. पण हल्ली प्रत्येक क्षेत्रात हे असं असतं. जेवढं या क्षेत्राला ग्लॅमर आहे, तेवढेच त्यासाठी कष्टही घ्यावे लागतात. पण हे क्षेत्र उत्तम आहे”, असे त्यांनी सांगितले.