काही मालिकांमधील कलाकार हे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. मात्र, काही कलाकारांना एकत्र पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी'(Satvya Mulichi Satvi Mulgi) या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिका संपल्यानंतरही कलाकार एकत्रितपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. डान्स, विनोदी रील व व्हिडीओच्या माध्यमातून हे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. आता या मालिकेतील अभिनेत्रींनी एकत्र येत रील शेअर केली आहे.
तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ
अभिनेत्री तितीक्षा तावडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर एकता व अभिनेत्री ऐश्वर्या नारकरदेखील दिसत आहे. ‘लव्हयापा’ या गाण्यावर त्यांनी रील शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये एकता व तितीक्षाने गॉगल लावल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचा हा हटके अंदाज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तितीक्षा तावडेने ‘Loveयाप्पा’,अशी कमेंट केली आहे. त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करीत त्यांचे कौतुक केले आहे. या सगळ्यात त्यांची सहकलाकार अमृता रावराणेने हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे. तर, सुरुची अडारकर व तितीक्षाचा पती सिद्धार्थ बोडकेनेदेखील हार्ट इमोजी शेअर केल्याचे दिसत आहे.
कलाकार मंडळींबरोबरच चाहत्यांनीदेखील त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी ‘तुमची आठवण येते’, असे लिहिले आहे. तर काहींनी त्यांच्या या रीलचे कौतुक केले आहे. काही चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे. एका नेटकऱ्याने ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’चा भाग दुसरा कधी येणार, असा प्रश्न विचारला आहे.
हेही वाचा: Baby John Ott Release : वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ ओटीटीवर पाहता येणार, कुठे आणि कधी? जाणून घ्या
झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेने काही दिवसांपू्र्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान पडद्यामागे होणारी मजा-मस्ती, शूटिंगदरम्यानचे किस्से, अप्रतिम डान्स, तर कधी खळखळून हसवणाऱ्या विनोदी रील अशा विविध माध्यमांतून ही कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या भेटीला येत असत. या मालिकेच्या सेटवर त्यांच्यात चांगले बॉण्डिंग झाल्याचे पाहायला मिळाले होते. मालिका संपल्यानंतरही या अभिनेत्री एकमेकींना आवर्जून भेटत असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते. आता हे सर्व कलाकार कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd