‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितीक्षा तावडे व ‘दृश्यम’ फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे. ८ फेब्रुवारीला या दोघांनी केळवणाचा फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. यानंतर आता अभिनेत्रीने त्यांच्या प्रपोजलची खास झलक युट्यूबवर शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी गेल्या काही दिवसांत लग्नगाठ बांधत एका नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. प्रथमेश-मुग्धा, गौतमी-स्वानंद, आशिष-स्वानंदी या लोकप्रिय जोड्यांपाठोपाठ आता तितीक्षा-सिद्धार्थ सुद्धा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर चालू होत्या. अखेर काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.

हेही वाचा : प्रथमेश परबच्या साखरपुड्यात अंगठीची होतेय चर्चा! अनोख्या डिझाइनने वेधलं लक्ष, पाहा फोटो

तितीक्षाने नुकताच तिच्या युट्यूब चॅनेलवर प्रपोजलचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तितीक्षा गाण्याच्या शूटसाठी सकाळीच सेटवर जात असल्याचं पाहायला मिळालं. लग्नाची मागणी घालण्यासाठी सिद्धार्थ देखील तिच्या मागोमाग सेटवर गेला होता. तितीक्षा सुंदर अशी साडी नेसून तयार होईपर्यंत अभिनेत्याने तिची वाट पाहिली. यानंतर तितीक्षाने गाण्याची रिहर्सल करण्यास सुरुवात केली. रिहर्सल सुरू असतानाच अंतिम टेकला गाण्यात सिद्धार्थने एन्ट्री घेतली आणि तितीक्षाला लग्नासाठी मागणी घातली. या दोघांनी हा सुंदर क्षण युट्यूबवर व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे.

हेही वाचा : आशुतोष गोवारीकर : ऑस्करवारी करणारा ‘लगान’ ते काळजाला भिडणारा ‘स्वदेस’! भारतीय सिनेमाला इतिहासाची जोड देणारा मराठमोळा दिग्दर्शक

दम्यान, सिद्धार्थ बोडके आणि तितीक्षा तावडेने एकत्र ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत काम केलं होतं. दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याशिवाय सिद्धार्थ बोडके ‘दृश्यम २’ या बॉलीवूड चित्रपटात व नुकताच ‘श्रीदेवी प्रसन्न’मध्ये झळकला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Titeeksha tawde and siddharth bodke dream proposal video shares by actress sva 00