Titeeksha Tawde Nashik Home Tour : लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांची जोडी यावर्षी २६ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली. या दोघांनी ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. ओळख, मैत्री अन् नंतर याचं रुपांतर प्रेमात होऊन या ऑनस्क्रीन जोडीने खऱ्या आयुष्यात एकत्र येण्याचा निर्णय घेतला. तितीक्षा मूळची कोकणातली आहे तर, सिद्धार्थ हा मूळचा नाशिकचा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यावर तितीक्षा व सिद्धार्थचं नाशिकच्या घरात जोरदार स्वागत झालं होतं. आपल्या सुनेचं स्वागत हक्काच्या घरात व्हावं अशी सिद्धार्थच्या आई-बाबांची मनापासून इच्छा होती. मात्र, बोडके कुटुंबीयांना यावर्षी गणपतीच्या सणाला नव्या घराचा ताबा मिळाला. यावर्षीचा गणेशोत्सव आणि आता लग्नानंतरची पहिली दिवाळी तितीक्षा-सिद्धार्थने नाशिकच्या नव्या घरात साजरी केली आहे.

हेही वाचा : प्रतीक्षा संपली! भुवनेश्वरी पुन्हा येणार…; अक्षराला दिसणार सासूबाईंची झलक, ‘या’ दिवशी असणार विशेष भाग, पाहा प्रोमो

तितीक्षा तावडेचं सासरचं घर

दिवाळीच्या मुहूर्तावर तितीक्षाने युट्यूबवर व्हिडीओ शेअर करत सासरच्या नव्या घराची पहिली झलक तिच्या सर्व चाहत्यांना दाखवली. घरात एन्ट्री घेतल्यावर प्रशस्त हॉल आणि त्यानंतर समोर असलेली बाल्कनी लक्षवेधी ठरते. त्यांच्या घरात एका बाजूला डायनिंग टेबल ठेवण्यात आलं असून, हॉलमध्येच तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नातील सुंदर फोटो ठेवल्याचं पाहायला मिळत आहे.

तितीक्षाने ( Titeeksha Tawde ) यानंतर त्यांची व सासू-सासऱ्यांची बेडरूम दाखवली. बोडके कुटुंबीयांच्या घराला सुंदर अशी गॅलरी आहे. या गॅलरीतून गोदावरी नदी व संपूर्ण नाशिक शहराचा व्ह्यू पाहायला मिळतो असं अभिनेत्रीने सांगितलं. याशिवाय आज या गॅलरीत दिवाळीच्या निमित्ताने आम्ही छान-छान फोटो काढले असंही तिने सांगितलं.

हेही वाचा : “शाहरुखने पाकिस्तानला हे-ते दिलं, या सगळ्या थापा…”, ‘किंग खान’च्या वाढदिवशी मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाले…

तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके नाशिकचं घर ( Titeeksha Tawde Nashik Home Tour )

तितीक्षाच्या सासू-सासऱ्यांनी नव्या घराच्या दारावर सुंदर अशी नेमप्लेट लावली आहे. बोडके असं आडनाव मोठ्या अक्षरात लिहून त्याखालोखाल संदीप ( अभिनेत्रीचे सासरे), पल्लवी ( अभिनेत्रीची सासू ), सिद्धार्थ तितीक्षा अशी नेमप्लेट त्यांनी नव्या घराच्या दाराबाहेर लावली आहे.

दरम्यान, तितीक्षाने ( Titeeksha Tawde ) शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “खूप खूप सुंदर आहे घर”, “किती छान तू आता नाशिकची झालीस”, “सुंदर घर आहे तुमची सगळी स्वप्नं पूर्ण होवोत” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Titeeksha tawde in laws new home in nashik nameplate grabs attention watch video sva 00