तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांचा विवाहसोहळा २६ फेब्रुवारी रोजी थाटामाटात पार पडला. या दोघांच्या लग्नाला कलाविश्वातील बरीच मंडळी उपस्थित राहिली होती. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर तितीक्षा-सिद्धार्थने लग्नगाठ बांधली. या जोडप्याच्या लग्नातील अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तितीक्षा आणि सिद्धार्थ दोघांच्याही व्यग्र वेळापत्रकामुळे लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच दोघेही आपआपल्या कामावर परतले होते. परंतु, आता एकमेकांसाठी वेळात वेळ काढून हे जोडपं व्हेकेशनचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : सलमानच्या घराबाहेर गोळीबार, वडील सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना फक्त…”
तितीक्षा आणि सिद्धार्थ एकत्र फिरायला गोव्याला गेले आहेत. याचा खास फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये सुंदर असा समुद्रकिनारा आणि व्ह्यू पाहायला मिळत आहे. याशिवाय तितीक्षाने नवऱ्याबरोबर शेअर केलेल्या रोमँटिक फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या दोघांची जोडी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. याआधी तितीक्षा-सिद्धार्थ नाशिकला अभिनेत्याच्या राहत्या घरी एकत्र लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा केला होता.
हेही वाचा : Video : प्रार्थना बेहेरेला पडली ‘गुलाबी साडी’ गाण्याची भुरळ! व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
सणानिमित्त तितीक्षा खास सासरी केली होती. यानंतर दोघेही आता गोव्यात एकत्र वेळ घालवत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर तितीक्षा सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.
तसेच अभिनेता सिद्धार्थ बोडके लवकरच ‘JNU- जहांगीर नेहरू’ युनिव्हर्सिटी या चित्रपटात झळकणार आहे. याआधी त्याने अजय देवगणच दृश्यम २ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘JNU’ येत्या २६ एप्रिलला प्रदर्शित होणार असून यामध्ये सिद्धार्थबरोबर अभिनेत्री उर्वशी रौतेला प्रमुख भूमिका साकारणार आहे.