‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १४ वर्षांपासून छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली. काही महिन्यांपूर्वी या मालिकेतीले अभिनेते शैलेश लोढा यांनीही या मालिकेला रामराम केला. त्यानंतर त्यांच्यात आणि मालिकेच्या निर्मात्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला दिसून येत आहे. अशातच शैलेश लोढा यांनी पुन्हा एकदा निर्मात्यांवर टोला लगावला आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत तारक मेहतांची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्यानंतर बरीच चर्चा रंगली होती. त्यानंतर मानधनावरून चर्चा रंगली. शैलेश लोढा यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. ते असं म्हणाले, “जे लोक इतरांचं टॅलेंट विकून पैसे कमवतात तेव्हा टॅलेंट असलेल्या लोकांनी कायमच आवाज उठवला पाहिजे. मी त्यातीलच एक व्यक्ती आहे. दुसऱ्यांच्या प्रतिभेवर मोठे होणारे लोक कधीच प्रतिभावान लोकांपेक्षा मोठे नाहीत. कोणताही प्रकाशक लेखकापेक्षा मोठा नसतो. कोणताही निर्माता अभिनेत्यापेक्षा मोठा नसतो. ते एक व्यावसायिक आहेत. जेव्हा एखादा निर्माता माझ्यासारख्या कवी, अभिनेत्यावर भारी पडतो तेव्हा मी आवाज उठवतो.” अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“माझे नातेवाईक…” ‘बिग बॉस’ विजेत्या अक्षयबरोबरच्या नात्यावर समृद्धी केळकरने सोडलं मौन
शैलेश लोढाच नव्हे तर आतापर्यंत मालिकेतील टप्पू त्याची आई म्हणजेच दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी, सोढीची भूमिका साकारणारा कलाकाराने मालिका सोडली आहे. या कलाकारांच्या जागी नवीन कलाकारांना संधी देत निर्माते ही मालिका पुढे नेत आहेत.
शैलेश लोढा हे गेल्या १४ वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा काम करत होते. यात त्यांनी तारक मेहताची भूमिका साकारली होती. पण २०२२ मध्ये त्यांनी अचानक ही मालिका सोडली. शैलेश लोढा मालिकेतून बाहेर पडल्यावर त्यांच्या जागी अभिनेता सचिन श्रॉफ तारक मेहता भूमिका साकारत आहे.