‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी, प्रोडक्शन हेड सोहेल रमानी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादात सापडले आहेत. मालिका सोडलेल्या काही कलाकारांनी त्यांच्यावर गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले आहेत. मिसेस रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारी जेनिफर मिस्त्री सातत्याने मालिकेच्या निर्मांत्यांवर आरोप करीत आहे. त्यानंतर आता मालिकेत बावरीची भूमिका साकारणाऱ्या मोनिका भदोरियाने सुद्धा निर्मात्यांवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अभिनेत्री गौहर खानने शेअर केली मुलाची पहिली झलक, बाळाचे नाव आहे खूपच खास

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बावरीची भूमिका साकारणाऱ्या मोनिका भदोरियाने सेटवर काम करताना आलेल्या अडचणींचा खुलासा ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. तसेच २०१५ पासून अभिनेत्री दिशा वाकानी शोमध्ये का येत नाही यावरही मोनिकाने भाष्य केले आहे.

हेही वाचा : Video : ‘ही चाल तुरूतुरू’नंतर मिथिला पालकरने आमिर-करीनाच्या ट्रेडिंग गाण्यावर बनवले नवे Cup Song, व्हिडीओ व्हायरल

मोनिका म्हणाली, “मालिकेच्या सेटवर सर्व कलाकारांना सोहेल रमानीने सर्वाधिक त्रास दिला आहे. त्याने एकदा सेटवरच्या खुर्च्या सुद्धा फेकून दिल्या होत्या, तो सर्वांशी उद्धटपणे वागतो आणि बहुतांश कलाकारांशी त्याचे भांडण झाले आहे. एवढी भांडणे होऊनही सोहेल अजून प्रोडक्शन हेड आहे, याउलट सर्व कलाकार शो सोडून जात आहेत. एकदा एक अभिनेता मी त्याचे नाव घेणार नाही, तो आपल्या आईला औषध देण्यासाठी गेला होता म्हणून त्याला सेटवर यायला उशीर झाला. तेव्हा सोहेलने आरडाओरडा सुरु केला, तो अतिशय घाणेरडा व्यक्ती आहे पुढे हे भांडण मारहाण करण्यापर्यंत पोहोचले होते.”

हेही वाचा : Ranbir Kapoor’s Animal: ठरलं! रणबीर कपूरच्या बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा प्री-टीझर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

‘तारक मेहता…’ मालिकेच्या सेटवर अभिनेत्री दिशा वाकानी म्हणजेच दया बेनला सुद्धा अशीच वागणूक मिळाली का? असा प्रश्न केल्यावर मोनिकाने म्हणाली, “कदाचित… तुम्हाला कोणीतरी जास्त मानधन देत आहे आणि पुन्हा मालिकेत ये म्हणून विनंती करत आहे, तर न येण्यामागे याच्याशिवाय दुसरे काय कारण असू शकते?” तसेच असित मोदींबद्दल “ते कलाकारांना नाही तर त्यांच्या टीमला सपोर्ट करतात.” असा दावा मोनिका भदोरियाने केला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmkoc actress monika bhadoriya says she is witnessed that production head raising his hands on an actor sva 00