छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेप्रमाणेच त्यातील कलाकरांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. याच मालिकेतून अभिनेत्री प्रिया अहुजालाही लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील रिटा रिपोर्टरने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेच्या दिग्दर्शकाबरोबर तिने आपली लग्नगाठ बांधली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने मालिकेबद्दल आणि खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका गेली अनेकवर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेचे चाहते आवर्जून ही मालिका बघत असतात. गेल्या काही वर्षांपासून यातील कलाकार मालिका सोडून जात आहेत. याबद्दल इटाईम्सशी बोलताना ती असं म्हणाली, “मी मालिका सोडलेली नाही. मी काही काळ याचे चित्रीकरण केले नाही कारण मला सांगण्यात आले की कथानकानुसार, माझ्या पात्राची रिटा सध्या गरज नाही. भविष्यात जेव्हाही ते मला चित्रीकरणासाठीसाठी बोलावतील तेव्हा मी ते करेन” अशी प्रतिक्रिया तिने दिली.

shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
priya bapat praises riteish deshmukh
“जेव्हा मराठी माणसं हिंदी सेटवर भेटतात…”, रितेश देशमुखबद्दल काय म्हणाली प्रिया बापट? ‘ती’ गोष्ट प्रचंड भावली
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
bigg boss marathi season 5 fame Ankita Walawalkar meet yogita Chavan with future husband before wedding
लग्नाआधी अंकिता वालावलकर भेटली योगिता चव्हाणला; फोटो पाहून ‘डीपी दादा’ची प्रतिक्रिया, म्हणाला, “पचणार नाही…”

ती सर्वात खोटारडी…” अक्षय कुमारबरोबरच्या अफेअरआधी अजय देवगणने रवीना टंडनवर केले होते गंभीर आरोप

या मालिकेचा दिग्दर्शक मालव राजदा याने मालिकेतून काढता पाय घेतला आहे. गेली १४ वर्ष ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत. ती पुढे असं म्हणाली “या मालिकेने मला आणि मालवला खूप काही दिले आहे. मालिकेने त्याला जे काही दिले त्याबद्दल तो आभारी आहे. आम्ही या मालिकेमुळे भेटलो त्यामुळे आमच्यासाठी हे आणखीन खास आहे.”

Video : धाकट्या लेकाचं करीना कपूरला कौतुक; वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

तिचा नवरा दिग्दर्शक असल्याने साहजिकच तिला भूमिका मिळणार असे लोकांना वाटते त्यावर अभिनेत्री म्हणाली, “अजिबात नाही! त्यात काही तथ्य नाही. मालव आणि मी आमचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य वेगळे ठेवतो. जेव्हा तो तारक मेहता मालिकेचा दिग्दर्शक होता तेव्हा मी त्याला कधीही लेखक किंवा निर्मात्याशी बोलण्यास सांगितले नाही. मला अलीकडेच एका भूमिकेसाठी विचारण्यात आले जो शो मालव दिग्दर्शित करणार होता. पण मी ती भूमिका स्वीकारू शकले नाही कारण सेट घरापासून खूप दूर आहे आणि मला तीन वर्षांचे मूल आहे.” अशी प्रतिक्रिया तिने दिली.

प्रिया अहुजा या मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारत आहे. २००८ पासून ती या मालिकेत काम करतेय. मालिकेत काम करता करता प्रिया दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली आणि २०११ मध्ये मालव आणि प्रियाने लग्न केलं. प्रियाने २००९ मध्ये ‘द स्टोनमॅन मर्डर्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने केके मेनन आणि अरबाज खानसोबत स्क्रिन शेअर केला होता.

Story img Loader