Marathi Serial TRP : छोट्या पडद्यावरील मालिका घराघरांत पाहिल्या जातात. मालिकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. प्रत्येक मालिकेची लोकप्रियता ही टीआरपीवरून ठरवली जाते. गेल्या काही वर्षांपासून TRPच्या शर्यतीत ‘स्टार प्रवाह’वरील मालिका अधिराज्य गाजवत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता या आठवड्यात टॉप १५ मालिका कोणत्या ठरल्या आहेत जाणून घेऊयात…
‘ठरलं तर मग’ मालिका गेली दीड वर्षे टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. सायली-अर्जुनची जोडी, मालिकेत झालेली प्रतिमाची एन्ट्री, रंजक कथानक या सगळ्यामुळे मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तर, दुसऱ्या स्थानावर कलाची ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका आहे. टॉप १३ मध्ये सगळ्या ‘स्टार प्रवाह’च्या मालिका व त्यांच्या काही मालिकांचे महाएपिसोड आहेत. मुक्ताच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत तिसरं स्थान मिळवलं आहे. तर चौथ्या, पाचव्या स्थानावर अनुक्रमे ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिका आहेत.
TRP च्या शर्यतीत ‘या’ आहेत टॉप – १५ मालिका
१. ठरलं तर मग
२. लक्ष्मीच्या पाऊलांनी
३. प्रेमाची गोष्ट
४. थोडं तुझं आणि थोडं माझं
५. घरोघरी मातीच्या चुली
६. येड लागलं प्रेमाचं
७. ठरलं तर मग – महाएपिसोड
८. साधी माणसं
९. अबोली
१०. शुभविवाह
११. मन धागा धागा जोडते नवा
१२. साधी माणसं – महाएपिसोड
१३. सुख म्हणजे नक्की काय असतं
१४. शिवा
१५. पारू
TRP च्या शर्यतीत टॉप १५ मध्ये ‘झी मराठी’च्या ‘शिवा’ अन् ‘पारू’ या दोन मालिका आहेत. याशिवाय अनुक्रमे सोळाव्या व सतराव्या क्रमांकावर अक्षरा-अधिपतीची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकांनी स्थान पटकावलं आहे. ‘झी मराठी’वर नव्याने चालू झालेली ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका तुलनेने मागे २.४ आकडेवारीसह २२ व्या स्थानावर आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात रितेश देशमुख होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस मराठी’ या शोची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात ‘बिग बॉस’मुळे ‘कलर्स मराठी वाहिनी’चा टीआरपी वाढेल का? या शोचा ओपनिंग टीआरपी काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.