TRP News : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन टेलिव्हिजनवर ऐतिहासिक ठरला. यंदाच्या सीझनला भूतो न भविष्यति असा रेकॉर्डब्रेक टीआरपी मिळाला आहे. २८ जुलैला हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं. यंदा पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुखने सांभाळली होती आणि रितेशच्या पहिल्याच पर्वाला ग्रँड ओपनिंग टीआरपी मिळाला. अगदी शेवटपर्यंत हा टीआरपी टिकून राहिला. मात्र, हा शो संपल्यावर ‘कलर्स मराठी’वर मोठा परिणाम झाला आहे.

‘बिग बॉस’ संपल्यावर ‘कलर्स मराठी’च्या टीआरपीमध्ये ( TRP ) मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या शोमुळे ‘कलर्स मराठी’ वाहिनी महाराष्ट्रातील वाहिन्यांच्या टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी पोहोचली होती. मात्र, हा शो संपल्यामुळे कलर्स मराठीला मोठा फटका बसला आहे. ‘बिग बॉस’ संपल्यावर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या गेल्या. पण, सध्या या मालिकांना फारसा प्रतिसाद मिळत नाहीये.

FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Nagpur Swapnils Bits Gang emerges as otorious gangs vanish from the city
शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात ‘बिट्स गँग’चा उदय, सत्ताधारी नेत्याच्या छत्रछायेत स्वप्निलचे दुष्कृत्य
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!

हेही वाचा : १६ वर्षांच्या संसारानंतर दिलीप कुमार यांनी गुपचूप केलेलं दुसरं लग्न; सायरा बानो यांना बसलेला मोठा धक्का, नेमकं काय घडलेलं? वाचा

टीआरपीच्या ( TRP ) शर्यतीत समोर आलेल्या नव्या आकडेवारीनुसार स्टार प्रवाह वाहिनी १ हजार ५७४ पॉइंट्ससह पहिल्या स्थानावर आहे. तर बिग बॉस संपल्याने कलर्स मराठीचा टीआरपी खाली घसरून ही वाहिनी चौथ्या क्रमांकावर गेली आहे. याशिवाय ५२९.१८ पॉइंट्ससह दुसरं स्थान ‘झी मराठी’ वाहिनीने पुन्हा एकदा मिळवलं आहे. तिसर्‍या स्थानावर ४५७.९४ पॉइंट्ससह सोनी सब ही वाहिनी आहे. तर, या आठवड्यात कलर्स मराठीला ३८५.७६ एवढं रेटिंग मिळालं आहे.

हेही वाचा : ४ वर्षांनी भारतात परतणारी मृणाल दुसानिस सुरू करणार स्वत:चा व्यवसाय? ‘त्या’ व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, नेटकरी म्हणाले…

TRP
कलर्स मराठीच्या TRP मध्ये घसरण

‘बिग बॉस’च्या ग्रँड फिनालेने शेवटी प्रेक्षकांचा निरोप घेताना देखील बाजी मारली आहे. रितेश देशमुखचं दोन आठवड्यांनी कमबॅक, स्पर्धकांचा कल्ला यामुळे यंदाचा ग्रँड फिनाले धमाकेदार ठरला आहे. ग्रँड फिनालेला ५ TVR एवढं रेटिंग मिळालं आहे.

हेही वाचा : ‘झापूक झुपूक’ सूरज चव्हाण अन् गौतमी पाटीलची भेट, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “भावाने मार्केट जाम केलंय”

दरम्यान, आता येत्या काळात ‘अशोक मा.मा.’, ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या नव्या मालिका ‘कलर्स मराठी’वर सुरू होत आहेत. आता या मालिकांमुळे चॅनलची लोकप्रियता ( TRP ) वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader