Online TRP : ‘बिग बॉस मराठी’ हा रिअ‍ॅलिटी शो जुलै महिन्याच्या अखेरिस प्रेक्षकांच्या भेटीला आला. या कार्यक्रमाला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: रितेश देशमुखचा भाऊचा अड्डा पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता असते. दिवसेंदिवस शोचा टीआरपी वाढत असल्याचं गेल्या काही आठवड्यांमध्ये पाहायला मिळालं. या आठवड्यात सुद्धा ऑनलाइन टीआरपीच्या यादीत ‘बिग बॉस मराठी’ने मोठी झेप घेतली आहे.

‘बिग बॉस मराठी’ कार्यक्रमामुळे या ऑनलाइन टीआरपीच्या ( TRP ) यादीत मोठा उलटफेर झाला आहे. लोकप्रिय मालिकांना मागे टाकत ‘बिग बॉस मराठी’ने या यादीत थेट तिसरं स्थान पटकावलं आहे. ऑनलाइन टीआरपीमध्ये पहिल्या स्थानी जुईची ‘ठरलं तर मग’ मालिका आहे. तर, दुसरं स्थान ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेने पटकावलं आहे.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Terrifying video of man crossing railway track fell down from barricade accident video viral
“एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO
Crime News
Crime News : थिएटरमधून अर्ध्यात सोडून गेल्याचा राग… बंगाली चित्रपटावरून एकाने पत्नीवर झाडल्या गोळ्या
two friends conversation brother got arrested
हास्यतरंग : अटक केली…
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance Video
‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट
ankita walawalkar aka kokan hearted girl first kelvan
‘कोकण हार्टेड गर्ल’ची लगीनघाई! अंकिता-कुणालचं पार पडलं पहिलं केळवण, फोटो आला समोर, लग्नपत्रिका पाहिलीत का?

हेही वाचा : Video: वडिलांच्या आत्महत्येबद्दल कळताच घरी परतली मलायका अरोरा; अर्जुन कपूर अन् अरबाज खानचे कुटुंबीयही पोहोचले

ऑनलाइन टीआरपीच्या ( TRP ) यादीत गेली दीड वर्षे ‘ठरलं तर मग’ मालिका पहिल्या स्थानावर आहे. तर, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला सुद्धा वर्षभरात चांगला टीआरपी मिळाला आहे. मात्र, या आठवड्यात ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला मागे काढत तिसऱ्या स्थानावर ‘बिग बॉस मराठी’ने झेप घेतली आहे.

ऑनलाइन TRP : पाहा टॉप १५ मालिका व कार्यक्रमांची यादी

१. ठरलं तर मग – हॉटस्टार
२. लक्ष्मीच्या पाऊलांनी – हॉटस्टार
३. बिग बॉस मराठी – जिओ सिनेमा
४. प्रेमाची गोष्ट – हॉटस्टार
५. थोडं तुझं आणि थोडं माझं – हॉटस्टार
६. घरोघरी मातीच्या चुली – हॉटस्टार
७. नवरी मिळे हिटलरला – झी ५
८. येड लागलं प्रेमाचं – हॉटस्टार
९. मुरांबा – हॉटस्टार
१०. मन धागा धागा जोडते नवा – हॉटस्टार
११. पारू – झी ५
१२. तुला शिकवीन चांगलाच धडा – झी ५
१३. शिवा – झी ५
१४. शुभविवाह – हॉटस्टार
१५. सुख म्हणजे नक्की काय असतं – हॉटस्टार

हेही वाचा : Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर जुई गडकरीने बनवले उकडीचे मोदक! नेटकरी कौतुक करत म्हणाले, “सर्वगुण संपन्न…”

trp
Online TRP : पाहा टीआरपीची यादी

दरम्यान, ऑनलाइन टीआरपीमध्ये टॉप-१५ मध्ये ‘हॉटस्टार’वर लागणाऱ्या एकूण दहा मालिका या ‘स्टार प्रवाह’च्या आहेत. तर ‘झी मराठी’ वाहिनीच्या एकूण ४ मालिका आहेत. गेल्या महिन्याभरात ‘बिग बॉस मराठी’ने लोकप्रिय मालिकांना चांगलीच टक्कर दिल्याचं पाहायला मिळत आहे. आता या शोने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला मागे टाकल्यामुळे पुढच्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’ची चुरस ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ आणि ‘ठरलं तर मग’ मालिकांबरोबर रंगणार आहे. आता येत्या काळात प्रेक्षक ‘बिग बॉस मराठी’ला कसा प्रतिसाद येणार आणि पुढच्या आठवड्यात टीआरपीच्या आकडेवारीत काय उलटफेर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader