‘तू चाल पुढं’ ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेत दीपा चौधरी, धनश्री काडगावकर, आदित्य वैद्य, वैष्णवी कल्याणकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. अलीकडे सगळेच कलाकार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. या मालिकेत शिल्पीची भूमिका साकारणाऱ्या धनश्री काडगावकरने अलीकडेच इन्स्टाग्रामवर प्रश्न-उत्तरांचं सेशन घेतलं. यामध्ये तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “२१ व्या शतकात दिल्लीत…”, सुव्रत जोशीने सांगितला लहान मुलांबद्दलचा प्रसंग; संतप्त पोस्ट करत म्हणाला, “लज्जास्पद…”

धनश्री काडगावकरने अलीकडेच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी’ सेशन घेतलं. यामध्ये अभिनेत्रीला तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. धनश्रीला तिच्या एका चाहत्याने, “प्रसूतीनंतर तू काम कसं सांभाळलंस? आपल्या बाळापासून दूर राहणं आईला खूप कठीण जातं. या सगळ्या गोष्टी तू कशा मॅनेज केल्यास?” यावर अभिनेत्रीने एका शब्दात उत्तर दिलं. ती म्हणाली, “याचं संपूर्ण श्रेय माझ्या नवऱ्याला जातं.”

हेही वाचा : “माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काम…”; स्वरा भास्करने शेअर केला प्रसूतीदरम्यानचा अनुभव; म्हणाली, “पिढ्यान् पिढ्या बायका..”

धनश्रीला आणखी एका चाहत्याने “शिल्पी खरंच सुधारली का?” असा प्रश्न विचारला होता. यावर “तुम्ही आता येणारे सगळे एपिसोड जरूर पाहा”, असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.

हेही वाचा : सार्वजनिक ठिकाणी किस केलंय का? आदिनाथ कोठारेने दिलेलं उत्तर चर्चेत, म्हणाला, “भारतात…”

धनश्री काडगावकर

दरम्यान, ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री धनश्री काडगावकरने ‘वहिनीसाहेब’ हे पात्र साकारलं होतं. या भूमिकेमुळे अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या ‘तू चालं पुढं’ या मालिकेतून धनश्री प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नव्या मालिकेतही ती ‘वहिनीसाहेब’प्रमाणे नकारात्मक ‘शिल्पी’ची भूमिका साकारत आहे.