अभिनेत्री अभिज्ञा भावे सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेमध्ये ती साकारत असलेलं वल्ली हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडत आहे. तिची ही नकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आज छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये अभिज्ञाचं नाव आवर्जून घेतलं जातं. पण अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी अभिज्ञा नोकरी करत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “आजी टीव्हीसमोर बसून मला शिव्या देते कारण…” ‘तू तेव्हा तशी’मधील वल्लीचा खुलासा

अभिज्ञाने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंस केलं. तसेच कलाविश्वामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान तिने निर्माण केलं. पण अभिज्ञा याआधी एअर होस्टेस म्हणून काम करत होती. याबाबत तिने स्वतःच खुलासा केला आहे.

अभिज्ञाने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की, “लोकांशी निगडीत किंवा लोकांना सांभाळण्याच्या निगडीत जी क्षेत्र आहेत त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये मला काम करायला आवडतं. म्हणूनच मी कदाचित एअर होस्टेस होते.”

आणखी वाचा – Video : “बाबा तू ये ना” वडिलांना पाहून चिमुकल्याच्या भावना अनावर, आरोह वेलणकरच्या लेकाने सगळ्यांनाच रडवलं

एअर होस्टेसची नोकरी करणं ही अभिज्ञाची आवड होती. पण नंतर कलाक्षेत्राची आवड निर्माण झाल्यानंतर तिने आपल्या मोर्चा अभिनेत्री म्हणून करिअर करण्याकडे वळवला. पण आजही मी एअर होस्टेस होते हे अभिज्ञा अभिमानाने सांगते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tu tevha tashi actress abhidnya bhave recalls memories as an air hostess see details kmd