मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरू आहे. एका पाठोपाठ एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. नुकतंच ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम अभिनेत्री भूमिजा पाटीलचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर छोट्या पडद्यावरील आणखी एका अभिनेत्याने गुपचूप साखरपुडा उरकला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

झी वाहिनीवरील ‘तु तेव्हा तशी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता स्वानंद केतकरचा साखरपुडा झाला आहे. स्वानंदने अक्षता अपटे हिच्याशी ४ जानेवारीला साखरपुडा केला. सोशल मीडियावरुन फोटो शेअर करत स्वानंदने ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. त्याच्या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा>> दीपिका-रणवीर २०२३ मध्ये होणार आईबाबा? अभिनेत्री म्हणालेली “आम्हाला मूल हवं आहे, पण…”

हेही पाहा>> “चांगल्या स्पर्धकांना बाहेर काढलं आणि…”, आरोह वेलकरणचं ‘बिग बॉस मराठी’बाबत मोठं वक्तव्य

स्वानंद व अक्षता गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. एकमेकांबरोबर फोटो ते अनेकदा शेअर करायचे. अक्षता ही एक अभिनेत्री व कवयित्री आहे. स्वानंद व अक्षयाने त्यांच्या नवीन इनींगला सुरुवात केली आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा>> के.एल.राहुल व अथिया शेट्टीची लगीनघाई! वेडिंग डेस्टिनेशन पाहून तुम्हीही म्हणाल काय झाडी, काय डोंगर…

‘तू तेव्हा तशी’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. स्वानंद ‘तु तेव्हा तशी’ मालिकेत नील ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली आहे. अभिनेता स्वप्नील जोशी व शिल्पा तुळसकर या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.