‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेने चार वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. त्यामुळे या मालिकेतील कलाकार घराघरात पोहोचले. शिवाय या कलाकारांनी साकारलेल्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मग तो राणादा असो किंवा नंदिता. प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना आपलंस केलं होतं. अजूनही ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचं शीर्षकगीत, काही सीन, कलाकार चर्चेत असतात. या मालिकेतील कलाकारांना पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे ओळख मिळालेल्या एका अभिनेत्याची नव्या हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये बरकतच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता अमोल नाईक आता नव्या हिंदी मालिकेत पाहायला मिळणार आहे. यासंदर्भात त्याने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेता झळकला नव्या मालिकेत, पाहा नवं रुप

‘स्टार प्लस’ वाहिनीवर ‘माटी से बंधी डोर’ नवी हिंदी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेत मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे व अभिनेता अंकित गुप्ता प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. याच मालिकेत अभिनेता अमोल नाईक देखील एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

‘माटी से बंधी डोर’ मालिकेचा पहिला प्रोमो शेअर करत अमोलने लिहिलं आहे, “श्री स्वामी समर्थ…तुमच्या सर्वाच्या आशीर्वादाने ‘स्टार प्लस’वरील नवीन सुरू होतं असलेल्या ‘माटी से बंधी डोर’ या मालिकेत एका वेगळ्या भूमिकेत तुम्हा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तुमची साथ, प्रेम, आशीर्वाद माझ्या व माझ्या टीमबरोबर कायम असतात. तसेच राहूदे…गणपती बाप्पा मोरया…श्री स्वामी समर्थ.”

हेही वाचा – Video: “अंघोळ पण कर…”, लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान अरिजीत सिंहला नखं कापताना पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले…

अमोलची ही पोस्ट पाहून चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. अमोल व्यतिरिक्त ‘स्टार प्लस’वरील या नव्या हिंदी मालिकेत अभिनेत्री मेघा घाडगे देखील पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, अमोल नाईकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्याने ‘तुझ्यात जीव रंगला’नंतर ‘झी मराठी’च्या ‘दार उघडं बये’ मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत त्याने सुन्याची भूमिका साकारली होती. याशिवाय अमोल ‘सन मराठी’च्या ‘सुंदरी’ मालिकेत झळकला होता. या मालिकेत अमोल विजूच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. तसंच ‘संत गजानन शेगावीचे’ मालिकेत देखील अमोलने काम केलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tujhyat jeev rangala fame actor amol naik cast in new hindi serial mathi se bandhi door on star plus pps