गेल्या काही महिन्यांत मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आपले स्वत:चे व्यवसाय सुरू केले आहेत. महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकर, सुप्रिया पाठारे, निरंजन कुलकर्णी, अभिज्ञा भावे, तेजस्विनी पंडित, प्रार्थना बेहरे अशा मराठी मनोरंजन विश्वातील असंख्य कलाकारांनी गेल्या काही दिवसांमध्ये अभिनय क्षेत्र सांभाळून स्वत:चे नवे व्यवसाय सुरू केल्याचं आपण पाहिलं. काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे अभिनेता हार्दिक जोशीने देखील स्वत:चा फूड ब्रँड सुरू केला होता. खवय्यांची मिळणारी वाढती पसंती पाहून आता अभिनेत्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला प्रेक्षकांचा लाडका राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आज ( ८ मार्च २०२४ ) त्याच्या ‘राणादा फूड्स’च्या नवीन शाखेचं उद्घाटन करणार आहे. इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत अभिनेत्याने ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. काही वर्षांपूर्वीच हार्दिकने ‘राणादा फूड्स’ हा स्वत:चा फूड ब्रँड सुरू केला होता. या ब्रँडची नवीन शाखा ( आऊटलेट ) आज कोल्हापूरात सुरू होणार आहे.

Shahi Dussehra Kolhapur, Vijayadashami celebration in Kolhapur,
कोल्हापुरात आज विजयादशमीची धूम; शाही दसऱ्याचे आकर्षण
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Pivali Jogeshwari Temple History
पुण्यातील या जोगेश्वरीला ‘पिवळी जोगेश्वरी’ का म्हणतात? जाणून घ्या काय आहे इतिहास?
Easy darshan for elderly devotees at Nrisimhawadi by Comfortable step height
नृसिंहवाडीत वयस्कर भाविकांसाठी दर्शन सुलभ; पायरीची उंची सोयीस्कर
Chaitanya Parva of Navratri begins in Kolhapur
कोल्हापुरात नवरात्रीच्या चैतन्यपर्वास प्रारंभ
sambhaji bhide criticized hindu community for making events of ganesh and navratri festival
हिंदू जगातील महामूर्ख जमात – संभाजी भिडे; गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाचे ‘इव्हेंट’ झाल्याची टीका
Chaitanya maharaj wadekar
प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराजांना अटक, नेमकं काय कारण? वाचा सविस्तर…
Dhule Crime News Nijampur
Dhule Crime News: प्रेयसीला भेटायला गेला अन् घात झाला! जिल्ह्यात निर्माण झाला तणाव, पोलीस म्हणाले…

हेही वाचा : ऋतुजा बागवे : रंगभूमीवर रमणाऱ्या ‘अनन्या’ला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार

हार्दिक जोशी याबद्दल माहिती देताना तो म्हणतो, “नमस्कार मंडळी…कोल्हापुरातील राजारामपुरी येथे माऊलीच्या पुतळ्याजवळ ‘राणादा फूड्स’चं नवीन आऊटलेट आम्ही सुरू करणार आहोत. याठिकाणी खवय्यांना बदाम थंडाई, मिसळ आणि शेगावची सुप्रसिद्ध कचोरी या पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळेल. तर नक्की या!”

हेही वाचा : ‘स्टार प्रवाह’वर सुरू होणार घरोघरी मातीच्या चुली! ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या वेळेत केला बदल, जाणून घ्या…

दरम्यान, हार्दिक जोशी हा मूळचा मुंबईचा रहिवासी आहे. त्याचं शिक्षण, बालपण सगळं काही मुंबईत झालं. परंतु, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या शूटिंगमुळे तो सतत कोल्हापूरात असायचा. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर ‘तुझ्यात जीव गुंतला’ या मालिकेमुळे हार्दिक-अक्षया प्रसिद्धीझोतात आले होते. या मालिकेत हार्दिकने राणादा, तर अक्षयाने अंजली पाठक ही भूमिका साकारली होती. राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मालिका संपल्यावर काही महिन्यांनी दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. थाटामाटात लग्न झाल्यावर हार्दिक-अक्षया सुखाने संसार करत असून त्याच्या रोमँटिक फोटोंवर चाहते नेहमीच कौतुकाचा वर्षाव करत असतात.