‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा अपघाती मृत्यू झाला आहे. कोल्हापूर सांगली महामार्गावर एका ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. तिच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या मृत्यूनंतर तिचे सोशल मीडियावरील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यातील बहुतांश व्हिडीओत ती भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याणी कुरळे ही छोट्या पडद्यावरुन प्रसिद्धीझोतात आली होती. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असायची. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहायची. गेल्या आठडाभरात कल्याणीने अनेक भावूक व्हिडीओ शेअर केले होते. तिच्या मृत्यूनंतर तिचे आठवड्याभरातील सर्वच व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओतून तिला स्वत:च्या मृत्यूची चाहूल लागली होती की काय असं बोललं जात आहे.
आणखी वाचा : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम कल्याणी कुरळेला ट्रॅक्टरची धडक, अभिनेत्रीचा जागीच मृत्यू

कल्याणीने तिच्या इन्स्टाग्रामवर तीन व्हिडीओ पीन करुन ठेवले आहेत. यातील पहिला व्हिडीओ हा तिच्या वाढदिवसाबद्दल असून इतर दोन व्हिडीओ हे तिच्या हॉटेलबद्दलचे आहेत. तिने आठवड्याभरापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती स्वयंपाकघरात जेवण बनवताना दिसत आहे. “आता येणारी वेळच सांगणार आम्ही किती किंमती होतो ते, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले होते.

तसेच तिने पाच दिवसांपूर्वी भाकरी थापतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला एक गाणे वाजताना दिसत आहे. ते गाणे फारच भावूक आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने ‘माझे पण दिवस येणार नक्की’, असे म्हटले आहे.

कल्याणीने आठवडाभरापूर्वीच तिचा वाढदिवस साजरा केला होता. त्यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात ती भाकरी थापताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने फारच हटके कॅप्शन दिले होते.

“काल माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला… मला खूप आनंद झाला मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली…मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्या कडून करून घेतले आहे. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊदे .. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असुदेत .. मला हे सगळ करण्यासाठी शक्ती द्या..”, असे तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले होते.

आणखी वाचा : “लोकांना प्रेमाची भाकरी…” आठवड्यापूर्वी वाढदिवस साजरा करणाऱ्या कल्याणी कुरळेच्या निधनानंतर ‘ती’ पोस्ट चर्चेत

कल्याणीने ३१ ऑक्टोबर रोजी एक फोटो शेअर केला होता. त्यात तिने कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडी सांगली फाटा या ठिकाणी एक हॉटेल सुरु केले होते. प्रेमाची भाकरी असे या हॉटेलचे नाव होते. याची माहिती तिने दिली होती. प्रेमाची भाकरी लई भारी, असे तिने याला कॅप्शन दिले होते.
त्याबरोबरच तिने एक व्हिडीओही शेअर केला होता. त्यात तिने ‘ज्यांनी मला थेंबासारखी साथ दिली, त्यांची मी नेहमी ऋणी राहिन’, असे कॅप्शन दिले आहे.

यानंतर दोन दिवसांपूर्वी कल्याणीने एक रिल व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘किस्मत से भी लड जाती मैं…’ असे कॅप्शन कल्याणीने या व्हिडीओला दिले आहे.

विशेष म्हणजे कल्याणीने काल एक व्हिडीओ शेअर केला होता. ‘वेळेची किंमत कळते वेळ निघून गेल्यावर आणि व्यक्ती व्यक्तीसाठी झुरतो व्यक्ती सोडून गेल्यावर…’, असे कॅप्शन या व्हिडीओला दिले होते.

याबरोबरच कल्याणीने ‘संयम’ असे कॅप्शन देऊनही एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओही सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओखाली तिचे अनेक चाहते तिला श्रद्धांजली वाहताना दिसत आहे.

कोल्हापूर सांगली महामार्गावर दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणी कुरळे हिने काही दिवसांपूर्वी कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडी सांगली फाटा या ठिकाणी एक हॉटेल सुरु केले होते. प्रेमाची भाकरी असे या हॉटेलचे नाव होते. हे हॉटेल बंद करुन बाहेर पडत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने तिला धडक दिली. या धडकेत तिचा मृत्यू झाला. तिच्या या मृत्यूच्या बातमीमुळे सर्वांनाच धक्का बसला. तिच्या मृत्यूनंतर मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

कल्याणी ही मूळची कोल्हापूरची आहे. ती महावीर कॉलेज परिसरात वास्तव्यास होती. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असायची. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहायची.

आणखी वाचा : Video : “व्यक्ती सोडून गेल्यावर…” ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम कल्याणी कुरळेचा मृत्यूच्या एक दिवसापूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

कल्याणी कुरळे ही छोट्या पडद्यावरुन प्रसिद्धीझोतात आली होती. तिने झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेत सहाय्यक व्यक्तिरेखेची भूमिका साकारली होती. यामुळे तिला घराघरात ओळख मिळाली. त्याबरोबर तिने सन मराठी या वाहिनीवरील दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतही काम केले होते. तिची ही भूमिकाही चांगलीच गाजली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tujhyat jeev rangala fame marathi actress kalyani kurale jadhav last week reel video caption goes viral nrp
Show comments