‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा कोल्हापूर सांगली महामार्गावरील ट्रॅक्टरने धडक दिल्याने मृत्यू झाला. कल्याणी ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री होती. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत तिने अभिनयाचा ठसा उमटवला होता. तिच्या मृत्यूनंतर मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणी कुरळे हिने काही दिवसांपूर्वी कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडी सांगली फाटा या ठिकाणी एक हॉटेल सुरु केले होते. प्रेमाची भाकरी असे या हॉटेलचे नाव होते. हे हॉटेल बंद करुन बाहेर पडत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने तिला धडक दिली. या धडकेत तिचा मृत्यू झाला.
आणखी वाचा : बिग बींच्या सुपरहीट चित्रपटांच्या यादीत खारीचा वाटा उचलणाऱ्या दिग्दर्शकाचे निधन; मुंबईत असणार शोकसभा

कल्याणी कुरळे हिने आठवडाभरापूर्वीच तिचा वाढदिवस साजरा केला होता. त्यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. काल माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला… मला खूप आनंद झाला मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली…मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्या कडून करून घेतले आहे. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊदे .. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असुदेत .. मला हे सगळ करण्यासाठी शक्ती द्या.., असे तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले होते.

कल्याणी कुरळे ही छोट्या पडद्यावरुन प्रसिद्धीझोतात आली होती. तिने झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेत सहाय्यक व्यक्तिरेखेची भूमिका साकारली होती. यामुळे तिला घराघरात ओळख मिळाली. त्याबरोबर तिने सन मराठी या वाहिनीवरील दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतही काम केले होते. तिची ही भूमिकाही चांगलीच गाजली होती.

कल्याणी ही मूळची कोल्हापूरची आहे. ती महावीर कॉलेज परिसरात वास्तव्यास होत्या. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असायची. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहायची.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tujhyat jeev rangala fame marathi actress kalyani kurale jadhav passed away nrp
Show comments